ETV Bharat / state

Bawankule Criticize INDIA : विरोधकांची आघाडी बारुद नसलेला बॉम्ब; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Nagpur News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध कॉंग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली ‘इंडिया’ (INDIA) आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून त्यांच्याकडून काहीच होणार नाही,अशी खरमरीत टीका (Bawankule Criticize INDIA) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते. (Chandrashekhar Bawankule)

Bawankule Criticize INDIA
चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 10:19 PM IST

Updated : Aug 30, 2023, 10:44 PM IST

नागपूर : मुंबईतील 'ग्रँड हयात' हॉटेल येथे मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या तारखेला होत आहे. इंडिया आघाडीचे घटकपक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहेत. ही त्यांची नौटंकी असून ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि परत निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १० ते १२ पक्ष असे आहेत की, त्यांचा कुठेही आमदार खासदार किंव्हा मंत्री नाही. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का, असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५ पेक्षा अधिक लोकसभा जागांवर विजय होईल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.( Bawankule Criticize INDIA ) (Chandrashekhar Bawankule)

कॉंग्रेसने केला डॉ. बाबासाहेंबाचा पराभव : प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलवले नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका कधीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पटली नाही. कॉंग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकरांविरुद्धच राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कॉंग्रेसनेच केला होता. तेव्हाही आणि आजही त्यांची भूमिका कायम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात जो कुणी त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी येईल त्यांचे एनडीएमध्ये स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले.(chandrashekhar bawankule on india alliance)

कर्नाटकच्या जनतेला कॉंग्रेसने फसवले : कर्नाटक निवडणुकीत जे आश्वासन कॉंग्रेसने तेथील जनतेला दिले आहे. ते कधीही पूर्ण करू शकणार नाही. त्यांनी कर्नाटकच्या जनतेला फसवले आहे. १० वर्षांचे बजेट जरी ५ वर्षांत खर्च केले तरी देखील ती आश्वासने पूर्ण होणार नाहीत, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

Devendra Fadnavis Loksabha : फडणवीस नागपुरातून लोकसभा लढवणार? बावनकुळे म्हणाले...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार, चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या- चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Bawankule Criticizes On sharad pawar: विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये जाऊन दंगे करायचे, शरद पवारांनाच सुचते - चंद्रशेखर बावनकुळे

Last Updated : Aug 30, 2023, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.