नागपूर - टेलिफोन एक्स्चेंज चौकातील जय दुर्गा ऑटोमोबाईल या पेट्रोल पंपावर काल (बुधवारी) सकाळी तेथील कर्मचाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांमध्ये दोन तरुणींचाही समावेश होता.
हेही वाचा - खुन प्रकरणातील सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद
दोन दुचाकींवर ट्रिपल सीट असे येऊन एकूण 6 जण पेट्रोल पंपावर आले होते. पेट्रोल भरल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यानी जेव्हा यांना पैसे मागितले, तेव्हा या सहा जणांनी वाद घालायला सुरुवात केली. काही वेळानंतर धारदार शस्त्रांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांवरच या हल्लेखोरांनी हल्ला केला. यात एक कर्मचारी जखमी झाला असून, एका हल्लेखोराला पकडण्यात पेट्रोल पंपावरचे कर्मचारी यशस्वी ठरले. इतर हल्लेखोर मात्र, फरार झाले आहेत.
हेही वाचा - पोलीस असल्याचे सांगून चालकास लुटणारी टोळी गजाआड