ETV Bharat / state

सराफा दुकान दरोडा प्रकरणी दोन आरोपींना मध्य प्रदेशातून फिल्मी स्टाईलने अटक; अमितेश कुमारांनी सांगितला थरार

नागपूर येथील अवणी ज्वेलर्स येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास चार सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. त्यानंतर सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना मध्यप्रदेशच्या कटणी येथून अगदी फ्लिमी-स्टाईलने पाठलाग करून अटक करण्यात आली आहे.

ARMED ROBBERY JEWELLERY SHOP TWO ACCUSED ARRESTED IN MP
नागपूर सराफा दुकान दरोडा प्रकरणी दोन आरोपींना मध्य प्रदेशातून फ्लिमी स्टाईलने अटक
author img

By

Published : Jul 8, 2021, 11:30 AM IST

नागपूर - शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम चौकातील अवनी ज्वेलर्स नामक सराफाच्या दुकानात मंगळवारी सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेची दोन आरोपींना मध्यप्रदेशच्या कटणी येथून अगदी फ्लिमी-स्टाईलने पाठलाग करून अटक करण्यात आली आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात दोन आरोपी गंभीर जखमी झाले आहेत तर दोन आरोपी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात रेकी करणाऱ्या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व घटनेचा थरार हा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितला आहे.

दोन आरोपींना मध्य प्रदेशातून फ्लिमी स्टाईलने अटक
  • ४०० तासांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले -

मंगळवारी दुपारच्या सुमारास अवणी ज्वेलर्स येथे चार सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान मालकाला ओलीस धरून मारहाण केली. त्यानंतर सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यामध्ये चार लाख रुपयांची नगदी रोख देखील होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक नागपूर बाहेर जाणाऱ्या मार्गांवर तैनात करण्यात आले होते. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ, चंद्रपूर आणि वर्धा सह अमरावती मार्गांचा समावेश होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही वेळात ८२ ठिकाणच्या सीसीटीव्हीमधील ४०० तासांची रेकॉर्डिंग तपासली. त्यानंतर आरोपी हे जबलपूरच्या दिशेने उत्तरप्रदेशकडे निघाल्याची खात्री पोलिसांना पटली. या प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेश येथील प्रतापगड आणि अलाहाबाद येथील असल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली.

  • महिलेच्या माध्यमातून दुकानाची रेकी -

सराफा दुकान मालकाने व्यक्त केलेल्या संशयानुसार, पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक महिला एका सहकाऱ्यासोबत दुकानात आली होती. ती महिला रेकी करण्याच्या उद्देशाने दुकानात आल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावरून त्या महिलेच्या हालचालीची विविध सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती महिला एका एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढत असल्याचे दिसून आले. या आधारे पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून एक जुलै रोजीच्या त्या वेळेत झालेल्या व्यवहाराची माहिती घेऊन त्या नंबरचे लोकशेन ट्रॅक केले. तर तो मोबाईल मध्यप्रदेशच्या जबलपूरच्या आधी ४० किलोमीटर अंतरावरील छापरा येथील एक लॉजमध्ये थांबले असल्याची माहिती समजली होती असे त्यांनी सांगितले.

  • मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक -

आरोपी ज्या लॉजमध्ये थांबले होते. ते ठिकाण नागपूरवरुन सुमारे सहा तासाच्या अंतरावर असल्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे तात्काळ मध्यप्रदेशच्या कटनी पोलिसांसोबत संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. आणि आरोपी ज्या ठिकाणी थांबले होते. ते देखील ठिकाण कटनी पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर कटणी पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत त्या लॉजवर छापा टाकला. तेव्हा आरोपी पोलिसांना बघताच पळाले. मात्र, पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईल ने पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन आरोपींची मोटारसायकल पोलिसांच्या वाहनाला धडकल्यामुळे एका आरोपीचा पाय फॅक्चर झाला तर दुसरा आरोपी जखमी झाला आहे. मात्र दुसऱ्या मोटारसायकल वर असलेले दोन आरोपी मोटारसायकल सोडून जंगलात पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. मध्यप्रदेश पोलिसांनी नगदीसह काही दागिने जप्त केले असून सोन्याचे दागिने पळून गेलेल्या आरोपींकडे असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - नागपुरात भरदिवसा सशस्त्र दरोडा; सराफा दुकान मालकाला ओलीस धरून नगदीसह लुटले लाखोंचे दागिने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.