नागपूर - पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जणारा अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यावर तरूण स्टंटबाजी करत आहेत.
मागील २ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तरुणांनी आणि नागपूरकरांनी ओव्हरफ्लोचा आनंद घेतला. तलाव पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. मात्र, काही तरुण उत्साहाच्या भरात फोटो काढण्याच्या नादात तलावाच्या सुरक्षा भींतीवर बसून स्टंटबाजी करत होते. जीवाची पर्वा न करता ही स्टंटबाजी हे तरुण करत होते.
हेही वाचा - केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्या जिल्ह्यात बाईक रॅलीतून वाहतूक नियमांची पायमल्ली