नागपूर - कर्नाटक सरकार Karnataka Maharashtra Border Dispute रोज नव्या धमक्या देत असताना राज्य सरकारकडून कुठल्याही पद्धतीचे उत्तर दिले जात नाही. राज्य सरकारने कर्नाटक सरकार विरोधातील Ajit Pawar Statement On Karnataka Border Dispute ठराव अद्याप केला नाही. तसेच कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar On Border Dispute यांनी आज सभागृहात Nagpur Winter Session केली. आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले, त्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कर्नाटक सरकारच्या दंडेलशाहीचा निषेध राज्य सरकारने कर्नाटक Karnataka Maharashtra Border Dispute विरोधातील कोणताही ठराव अद्याप सभागृहात Nagpur Winter Session केलेला नाही. कर्नाटक सरकारच्या दंडेलशाहीचा निषेध करणारा ठराव राज्य सरकार लवकरात लवकर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री आज अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात आपली भूमिका काय घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने ताबडतोब कर्नाटकला Ajit Pawar Statement On Karnataka Border Dispute जशास तसे उत्तर दिले पाहिजे. तसा ठराव केला पाहिजे असेही अजित पवार Ajit Pawar On Border Dispute यावेळी म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते Maharashtra Ekikaran Samiti Protest In Kolhapur आज कोल्हापुरात येत आहेत. तिथे आंदोलन करत आहेत. तो त्यांचा अधिकारच आहे, मात्र त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. राज्य सरकारने तिथे जायला पाहिजे, असे सांगत प्रश्नोत्तराच्या तासात आधी या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलना विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक, राजीनामा द्या राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, द्या खोके, भूखंड ओके. कर्नाटक सरकार हाय हाय, संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला भाव मिळालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या Karnataka Maharashtra Border Dispute आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिवाळी अधिवेशनाचा Nagpur Winter Session आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar Statement On Karnataka Border Dispute आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.