नागपूर - अजित पवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक प्रतिज्ञा पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी स्वतःला सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत निर्दोष सांगत, एसीबी चौकशी योग्य दिशेने असल्याचे नमूद केले आहे. सरकार बदलले म्हणून तपास यंत्रणा ही बदलावी, हे काही आधार असू शकत नाही, असा तर्क अजित पवारांनी उपस्थित केला.
या प्रकरणात एक याचिककर्ता अतुल जगताप स्वतः कंत्राटदार असून त्यांनी काही सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळवले, असे असताना ते सिंचन घोटाळ्यात कसे काय जनहित याचिका करू शकतात? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - नागपूरमध्ये आंतरराज्यीय हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सुशिक्षित तरुणींचा होता सहभाग
या प्रकरणात एक याचिककर्ता अतुल जगताप स्वतःहा कंत्राटदार असून त्यांनी काही सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळवले होते. त्यामुळे सिंचन घोटाळ्यात ते कसे काय जनहित याचिका करू शकतात? असा प्रश्न सुद्धा पवारांनी उपस्थित केला. तसेच राजकीयदृष्ट्या माझा छळ करत माझ्या राजकीय जीवनाला हानी पोहोचवण्याचा याचिकाकर्ता यांचा कट असल्याचे त्यांनी प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.
अजित पवार यांनी त्यांच्यावर सिंचन घोटाळ्यात करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच मी नेहमीच तपास यंत्रणांसोबत सहकार्य केले असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. मी सिंचन घोटळ्यासंदर्भात कुठे ही दोषी नाही, मला या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीने जी प्रश्नावली दिली होती, त्याची उत्तरे मी त्यांना दिली आहेत, असेही पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे चौकशी एसीबीकडून काढून घेऊन दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देण्याची गरज नसल्याचे पवार यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एसीबीने अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यात भूमिका नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात एसीबीकडून देण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रानंतर जनमंच आणि इतर काही याचिकर्त्यांनी याप्रकरणाचा तपास एसीबीकडून काढून घेतल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा तपास सीबीआय किंवा इतर तत्सम यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेसंदर्भात आज अजित पवार यांनी त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात दाखल केले.
हेही वाचा - ...अन् दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास