नागपूर - गोड्या तेलात भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार नागपुरातील एका तेलाच्या गोडाऊनवर धाड टाकण्यात आली. यात लाखो रुपये किमतीचं भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले. या तेलाचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा- राष्ट्रपती राजवट ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया - आमदार राम कदम
नागपूर-भंडारा मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ इशिता ट्रेडिंग कंपनीच्या नावाने तेलाचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये तेलात भेसळ केली जात असल्याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. तक्रारीवरुन अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी त्या गोडाऊनवर धाड मारली. या वेळी अधिकाऱ्यांनी लाखो लिटर तेल जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.