ETV Bharat / state

नागपूर : स्वतःच्याच पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी दिला चोप

एका दारुड्या काकानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनिल अशोक पाटील असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांना आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती समजताच काहींनी आरोपीला मारहाण केली.

nagpur
nagpur
author img

By

Published : Aug 2, 2021, 4:39 PM IST

नागपूर - मतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या काकानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनिल अशोक पाटील असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांना आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती समजताच काहींनी आरोपीला मारहाण केली. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असल्याने स्थानिकांनी या संदर्भात वाडी पोलिसांना सूचना देऊन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

रिपोर्ट

आरोपीला अटक -

आरोपी अनिल अशोक पाटील हा दारूच्या नशेत परिसरातील तरुण मुलीसह वयोवृद्ध महिलांची छेड काढायचा. या संदर्भात अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने त्याची हिंमत वाढली होती. काल दुपारी आरोपीने दारूच्या नशेत स्वतःच्याच सात वर्षीय पुतणीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. या चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही नागरिकांनी धाव घेतली. त्यावेळी आरोपी नग्न अवस्थेत होता. त्यामुळे संतापलेल्या काहींनी आरोपीला चोप दिला. घटनेची माहिती समजताच वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गतिमंद मुलीवर दोन वेळा बलात्कार -

नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. ही घटना गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे दरम्यान घडली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी नराधमांनी मदतीच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केला. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण, म्हणाली- मागील काही दिवस फार संघर्षमय राहिले..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.