नागपूर : इमरान खट्टा ( वय २६) असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर गोवंश तस्करीचा आरोप होता, अशी माहिती पुढे आली आहे. इमरान खट्टा विरोधात नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्यात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेण्याकरिता देवलापार पोलिसांचे एक पथक नागपुरमध्ये आले होते. त्याचदरम्यान आरोपी इमरान खट्टा हा उप्पलवाडी या भागात लपून असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे देवलापार पोलीस उप्पलवाडी भागात दाखल झाले. इमरान खट्टा ज्या इमारतीत लपलेला होता, त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले ही बाब समजल्यानंतर इमरानने थेट इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली.
इमरान खट्टा गंभीर जखमी : थेट इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारल्यामुळे आरोपी इमरान खट्टा गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या भीतीपोटी इमरान खट्टा याने इमारतीवरून उडी घेतल्याचे समजल्यानंतर उप्पलवाडी भागातील स्थानिक आक्रमक झाले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. गोवंश तस्करीचा आरोपी इमरान खट्टा कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपलेला आहे. माहिती समाजल्यानंतर देवलापार पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर धाड टाकण्याचे नियोजन केले. इमरानला पकडताना झालेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत तो खाली पडला, त्यामुळे इमरानचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
गुन्हेगारांबरोबर चकमकीत पोलिसांच्या मृत्युची घटना :: झारखंडच्या देवघर येथे मासळी व्यावसायिकाच्या सुरक्षेत गुंतलेल्या दोन पोलिसांवर गुन्हेगारांनी गोळी झाडली होती. त्यात दोन्ही जवान शहीद झाले होते. ही घटना 12 फेब्रुवारीच्या रात्री 12.30 च्या सुमारास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामगंज रोड आंदा पट्टी येथे घडली होती. देवघर येथील मासे व्यावसायिक सुधाकर झा यांच्यावर रात्री गुन्हेगारांनी हल्ला केला होता. शस्त्रधारी गुन्हेगारांनी त्यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. या हल्ल्याला सुधाकर झा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सरकारी अंगरक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या या दोन जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना गोळ्या घातल्या होत्या. मात्र या चकमकीत हे दोन्ही पोलीस शहीद झाले होते. आठवडाभरात नक्षलवाद्यांकडून हत्येची ही दुसरी घटना होती. या अगोदर छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सागर साहू यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली होती.