नागपूर - पदवीधर निवडणुकीतील विजयानंतर कॉंग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांनी नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात जावून सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत काही मोजके कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर निवडणुकीचे नुकतेच निकाल जाहीर झाले. यानिवडणुकीत भाजपा उमेदवार संदीप जोशी व कॉंग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांच्यात लढत पहायला मिळाली. यात अभिजीत वंजारी हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी होताच त्यांनी शहरातील गणेश टेकडी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अभिजीत वंजारी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. शिवाय या निवडणुकीसाठी सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी आपली ताकद लावली होती. त्यामुळे विजय मिळताच वंजारी यांनी गणपतीचे दर्शन घेत पुढील वाटचालीकरिता प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी स्मिता तसेच मुलगी देविकाही प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा - यशाचे रहस्य तिन्ही पक्षांच्या एकत्र कामात - राजेश टोपे