ETV Bharat / state

नागपुरातील तरुणीची कमाल, पेंटिंगद्वारे कोरोनाच्या नकारात्मकतेवर केली मात

author img

By

Published : Sep 17, 2020, 5:58 PM IST

कोरोना झाल्यानंतर घराच्या एका खोलीत कैद झालेल्या रेणुकामधील कलाकार जागा झाला. अवघ्या काही दिवसात रेणुकाने तिच्या खोलीच्या भिंतीवर पेंट आणि ब्रशच्या मदतीने सुंदर कलाकृती रेखाटली. एवढेच नव्हे तर, रेणुकाने घराच्या इतर भिंतींवरसुद्धा कोरोनावर केलेल्या विजयाचा इतिहास रेखटला.

रेणुका खोडे
रेणुका खोडे

नागपूर - कोरोना रुग्णाला ज्यावेळी घरा शेजारच्यांच्या आपुलकीची गरज असते त्यावेळी त्यांच्या तिरस्कारांच्या नजरांमुळे तो रुग्ण कोरोनावर मात करण्याची उमेद हरवून बसतो. मात्र, समाजात असे देखील काही अवलीये आहेत, ज्यांच्या नशिबी समाजाची नकारात्मकता आल्यानंतर त्यांनी यावर मात करत समजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. रेणुका खोडे असे या तरुणीचे नाव आहे. तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर कमाल केली आहे.

माहिती देताना रेणुका खोडे

पूर्व नागपूरच्या खरबी परिसरात राहणारी रेणुका खोडे ही तरुणी गेल्या महिन्याच्या १८ तारखेला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. रेणुकाला कोरोना झाल्याचे समजताच तिचे शेजारी, जिवाला जीव देणारे मित्र-मैत्रीण आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. ज्यांच्या भरवशावर जगण्याची उमेद असायची तेच आपल्याला टाळू लागल्यानंतर रेणुकाच्या मनात नकारात्मक विचारांची मांदियाळी सुरू झाली होती. त्याच वेळी रेणुकाच्या आईने दिलेला सल्ला तिला नकारात्मकतेच्या गर्ततेतून बाहेर पडण्यासाठी फार उपयोगी ठरला.

कोरोना झाल्यानंतर घराच्या एका खोलीत कैद झालेल्या रेणुकामधील कलाकार जागा झाला. अवघ्या काही दिवसात रेणुकाने तिच्या खोलीच्या भिंतीवर पेंट आणि ब्रशच्या मदतीने सुंदर कलाकृती रेखाटली. एवढेच नव्हे तर, रेणुकाने घराच्या इतर भिंतींवरसुद्धा कोरोनावर केलेल्या विजयाचा इतिहास रेखटला. तुम्ही भलेही कोरोनाबाधित झाले तरी तुमच्यात नकारात्मकतेला येऊ देऊ नका, असा सल्ला रेणुकाने इतरांना दिला. विलगीकरणात असताना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत रेणुकाने संपूर्ण घर पेंटिंगने सजवले आहे. तिच्या या प्रयत्नांना मिळालेल्या यशामुळे जीवन जगण्याचा मार्ग देखील सुकर झाला आहे.

हेही वाचा- टिंबर मार्केटला लागलेल्या आगीत मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.