नागपूर: शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक बाब नागपुरात समोर आली आहे. या घटनेत एका गणित विषय शिकवणाऱ्या 57 वर्षीय शिक्षकाने 12 वर्षीय मुलीवर शाळेतील प्रयोग शाळेत नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक दिवस मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तीला खुप त्रास होत होता. तेव्हा तीने संबंधित शिक्षक संजय विठ्ठल पांंडे याने तीच्या सोबत केलेल्या कृत्याची माहिती घरी सांगितली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.
वारंवार बलात्कार : प्राप्त माहिती नुसार संजय पांडे हे गणित विषय शिकवतात. शिकवता शिकवता त्यांनी एका 12 वर्षाच्या विद्यार्थिनीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तीला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगत तीच्याशी जवळीक साधली. 57 वर्षीय शिक्षकाने अवघ्या सहावित शिकणाऱ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात गुंतवत तीला आमिष दाखवत तीच्या सोबत तो लगट करु लागला. आणि तीच्या सोबत चाळे सुरु केले सोबतच त्याने सुमारे 5 महिण्यापासून तीच्या सोबत वारंवार बलात्कार करत राहीला.
अचानक पोटदुखीचा त्रास : घाबरलेली मुलगी त्याच्या कृत्यामुळे त्रस्त होती पण ती कोणाशी बोलू शकत नव्हती. त्यातच त्याची चटक वाढत गेली तो तीला वारंवार प्रयोगशाळेत नेऊन तेच ते कृत्य वारंवार करु लागला. एक दिवस शाळेतून आल्या नंतर त्या मुलीला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला. तीने या बाबत आईला सांगितले. चार दिवसापूर्वीती शाळेतून घरी आली तेव्हा तीला जास्तच त्रास जाणवू लागला तेव्हा तीने शिक्षकाच्या या कृत्या बद्दल घरी सांगितले.
जीवे मारण्याची धमकीही : पिडितेच्या पालकांनी आधी तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा तीने सांगितले की आधी सरांनी मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे असे सांगून वेळोवेळी प्रयोग शाळेत घेऊन जात आणि तेथे बळजबरी करायचा हा प्रकार सुमारे 5 महिन्यापासून सुरु आहे. नंतर नंतर त्यांने या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारुन टाकेन अशी धमकी द्यायला सुरवात केली त्यामुळे मी घाबरली असे त्या मुलीने पालकांना सांगितले.
पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल : याप्रकरणी पिडित मुलगी आणि तीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपीविरूध्द पोक्सो कायदा तसेच भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६ (एबी), ३७६ (२) (फ), ३७६ (२) (एन), ५०६, सहकलम ४, ६ अन्वये गुन्हा नोंदवूला असून नराधम आरोपीस अटक केली आहे.
हेही वाचा : Buldhana Crime News: खळबळजनक! १० वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना