नागपूर - जिल्ह्यातील उमरेडमध्ये बँक खात्यात पैसे भरायला जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला चाकू मारून लुटल्याची घटना काल (सोमवार) घडली होती. निकेश तोलानी हे व्यापारी काल दुपारी युनियन बँकेत पैसे टाकायला जात असताना 4 लुटारूनी त्यांना बँकेच्या दारावरच गाठले आणि त्यांच्यावर चाकूचे अनेक वार करत त्यांना गंभीर जखमी केले. जखमी झाल्याने निकेश तोलानी यांचा विरोध कमी होताच लुटारूंनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला.
लुटारूंनी पळवलेल्या बॅगेत 8 लाख 53 हजार रुपयांची रोकड होती. घटनेनंतर चारही लुटारू एकाच दुचाकीवर पळून गेले. दरम्यान, बँकेसमोर अनेकांच्या देखत घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून भर बाजारातील या घटनेनंतर उमरेड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - नागपुरात दोन ठिकाणाहून १ कोटीची रक्कम जप्त