नागपूर: लॅपटॉप नागपूरच्या पारडी भागातून चोरीला गेले होते. या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा सहभाग असून लवकर त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू येथे कार्यरत एका कंपनीला लॅपटॉपची मोठी ऑर्डर मिळाली होती. त्या पैकी ६८५ लॅपटॉप आणि इतर महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य त्या कंपनीने लॉजिस्टिक एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनीत बुक केले होते. २६ मे रोजी कंटेनर सामान घेऊन बेंगळुरू येथून दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाला. तो कंटेनर २९ मे रोजी नागपुरात दाखल झाला.
अधिकाऱ्यांनी थेट गाठले नागपूर: बंगलोर ते नागपूरच्या प्रवासादरम्यान कंपनीचे संचालक आणि कंटेनर चालकाच्या संपर्क हा सुरू होता. मात्र, पुढील दोन दिवस कंटेनरचे लोकेशन एकाच ठिकाणी दाखवत होते. शिवाय कंटेनर चालकाने फोन बंद केल्यामुळे काहीतरी गडबड आहे याची जाणीव लॅपटॉप कंपनीच्या अधिकाऱ्यांना झाली होती. त्यांनी थेट नागपूर गाठले असता पारडी भागात त्यांना कंटेनर उभा आढळला. त्यांनी आजूबाजूला ड्रायव्हरची चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळत नसल्याने पारडी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली.
आरोपी गुजरातला पळाले: पोलिसांनी पारडी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले तेव्हा कंटेनरमधील लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य दुसऱ्या कंटेनरच्या मदतीने चोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी टोल नाक्यावरील शेकडो सीसीटीव्ही तपासले तेव्हा आरोपी गुजरातच्या सुरत जवळील बारडोली येथे असल्याची बाब समोर आली. त्यानंतर नागपूर शहर पोलिसांनी आरोपी हरीश हजर खान आणि मोहम्मद खान या दोघांना अटक केली आहे.
मुद्देमाल हस्तगत: नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता आरोपी गुजरातला पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांच्या एका पथक गुजरातला जाऊन दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळील सात कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा: