नागपूर- नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी नागपूर शहरात ६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह नापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा २ हजार ५७१ वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनने आधीच संस्थात्मक क्वारंटाईन केले होते.
बुधवारी ३५ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ६२० इतकी झाली आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे यासह एकूण मृत्यूचा आकडा ४० वर गेला आहे.
४० पैकी २५ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर १५ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. याशिवाय अमरावती आणि अकोला येथील कोरोनाबाधितांचे मृत्यू नागपूरमध्ये झालेले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये होणारी एकूण मृत्युसंख्या ४२ एवढी झालेली आहे. सध्या नागपुरातील ७ ठिकाणी ९११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) १२५ तर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात (मेडीकल) १७२, एम्समध्ये ५१, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये ३२ आणि खासगी रुग्णालयात २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १८४ आणि आमदार निवासमध्ये २४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३. टक्के इतके आहे. तर मृत्यू दर हा १.५५ इतका आहे.