नागपूर - कायदा सुव्यवस्थेचा विचार करता मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही लावण्यात येतील, अशी माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. याशिवाय जुन्या इमारतींसह बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन इमारतीत तशी रचना करण्याची सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्रातही आता दिल्लीचा मोफत वीज पॅटर्न?
'सीसीटीव्हीच्या आधारे कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवता येईल' असेही त्यांनी सांगितले. याबाबतचा कायदा लवकरच आणणार असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : दोषींना पुढील फाशीची तारीख जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार