नागपूर - जिल्ह्यासह पूर्व विदर्भात म्युकर मायकोसिस आजाराने थैमान घातले आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण समोर येत आहे. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार शासकीय रुग्णालयात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, पूर्व विदर्भात ७२९ रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे.
जिल्ह्यात पोस्ट कोविडमध्ये १ हजार ५४ रुग्णांना हा आजार झाला. यात उपचारादरम्यान तब्बल ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वच रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये शासकीय रुग्णालयात 15 तर खासगी रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांपैकी शासकीय रुग्णालयांत २३९, खासगी रुग्णालयांत ७०० असे एकूण ९३९ रुग्ण उपचारासाठी आतापर्यंत दाखल झाले आहे. यामध्ये ६८२ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
गडचिरोलीत म्युकर मायकोसिसचा शिरकाव नाही..
चंद्रपुरात आतापर्यंत ५६ रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गोंदियात १६ रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला. वर्ध्यात ३९ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर सावंगी मेघे आणि सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णलयात उपचार सुरू आहे. वर्ध्यात अद्याप मृत्यूची नोंद नाही. भंडाऱ्यात ४ रुग्ण आढळले आहेत.
पूर्व विदर्भात 409 रुग्णांवर उपचार सुरू..
नागपुरात आढळलेल्या रुग्णांपैकी ६८२ जणांवर शस्त्रक्रिया झाल्या. त्यापैकी 339 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 343 जण उपचार घेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 34 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली असून 4 जणांना डिस्चार्ज दिला असून 30 जण उपचार घेत आहेत. वर्ध्यातील तीन रुग्ण बरे झाले असून ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.