नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस विक्रमी रूग्णसंख्येची नोंद होत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात नागपूरमध्ये 4 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, पूर्व विदर्भात ही संख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला.
राज्यातील कोरोना स्थिती बिकट -
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकाने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र होते. आता पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 8 ते 9 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. मात्र, सध्या देशातील 60 टक्के कोरोना रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने उपाय योजानाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होत आहेत. जास्त रूग्ण असलेल्या काही शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
हेही वाचा - राज्यातील 5 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या