ETV Bharat / state

नागपूर महापौर, उपमहापौर निवडणूक; पदांकरिता प्रत्येकी ४ उमेदवार रिंगणात - Nagpur Deputy Mayor Election candidates Number

महापौर पदासाठी ४ आणि उपहापौर पदासाठी देखील ४, असे एकूण ८ उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र (अर्ज) निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे सादर केले. विशेष म्हणजे, ८ उमेदवारांद्वारे एकूण १६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

Nagpur mayor election
नागपूर महापौर, उपमहापौर निवडणूक
author img

By

Published : Dec 30, 2020, 8:45 PM IST

नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित १३ महिन्यांच्या कालावधीसाठी ५ जानेवारी २०२१ ला निवडणूक होणार आहे. महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांच्याकरिता भाजपने निर्धारित केलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्या महापौर आणि उपमहापौर पदाकरिता निवडणूक घेतली जात आहे. महापौर पदासाठी ४ आणि उपहापौर पदासाठी देखील ४, असे एकूण ८ उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र (अर्ज) निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे सादर केले. विशेष म्हणजे, ८ उमेदवारांद्वारे एकूण १६ नामनिर्देनशन पत्र दाखल झाले आहेत.

हेही वाचा - 'भाजयुमो'चा गृहमंत्र्यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न

२१ डिसेंबर रोजी संदीप जोशी यांनी महापौर पदाचा व मनीषा कोठे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, आता नवीन महापौर निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी प्रभाग १९ ‘ड’ चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी यांनी नामनिर्देशन सादर केले. उपमहापौर पदासाठी पक्षाकडून प्रभाग २३ ‘ब’ च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे यांनी नामनिर्देशन सादर केले. याशिवाय महाविकास आघाडीकडून प्रभाग ३३ ‘ड’ चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले आहे. तर, उपमहापौर पदाकरिता महाविकास आघाडीकडून प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगलाबाई प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले आहे.

महाविकास आघाडीमध्ये फूट दिसून येते

या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २० ‘क’ चे नगरसेवक रमेश गणपती पुणेकर यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ‘ड’ चे नगरसेवक नरेंद्र नथ्थुजी वालदे यांनी सुद्धा महापौर पदाकरिता नामनिर्देशन सादर केले आहे.

महापालिकेत भाजपकडे बहुमताचा आकडा

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरातील महानगर पालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. १५१ सदस्य असलेल्या नागपूर मनपामध्ये भाजपचे १०८ नगरसेवक आहेत. त्यामुळे, या निवडणुकीत भाजपला आरामात विजय मिळेल, असे समीकरण सांगत आहे. तर, काँग्रेसकडे २८ नगरसेवक आहेत. शिवाय, बसपाचे ७ नगरसेवक असून शिवसेनेकडे केवळ ३ नगरससेवकांची ताकत आहे. त्यामुळे, मनपातील विरोधक फारसे प्रभावी ठरणार नाहीत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

हेही वाचा - नागपूर: स्पेसवूड कंपनीला भीषण आग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.