ETV Bharat / state

31 Years Of Mowad Flood : जलप्रलयाची ३१ वर्षे! वर्धामायीत २०४ गावकऱ्यांना मिळाली जल समाधी, जखमा आजही कायम - नदी नाले तुडुंब भरले

३० जुलै १९९१ च्या पहाटे नागपूरच्या मोवाडमध्ये वर्धा नदीला पूर ( Wardha river overflowed ) आला होता. त्या महापूरात 204 जणांना जलसमाधी मिळाली होती. आज त्या घटनेला 31 वर्षे झालीत. आजही तिथल्या नागरिकांना ती घटना अविस्मरणीय आहे. त्यामुळे मोवाडवासींकडून आजचा दिवस काळादिवस म्हणून पाळला जातो.

Mowad Flood
जलप्रलयाची ३१ वर्षे
author img

By

Published : Jul 30, 2022, 12:03 PM IST

मोवाड ( नागपूर ) - नागपूर जिल्ह्याच्या मोवाड ( Mowad Village In Nagpur District ) येथे ३० जुलै १९९१ च्या पहाटे आजपासून ३१ वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात २०४ गावकऱ्यांना मृत्यू झाला ( 204 villagers died in Flood ) होता. आज या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली असली तरी जखमा मात्र आजही ताज्या आहेत. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापूराच्या असंख्य वेदना आणि आठवणी आजही कायम आहे. नदीच्या काठावरील गावांवर वर्धा नदी कोपली होती ( Wardha river overflowed ) . १२ गावांना वर्धा नदीने आपल्या विळख्यात घेतले होते ( 12 villages on the banks of Wardha river overflowed ) . तिने मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. त्यामुळे मोवाडवासी आजचा दिवस काळादिवस म्हणून पाळतात.

मोवाड हे सोन्याचे कवाड - मोवाड हे सोन्याचे कवाड (दार) ही म्हण संपूर्ण नागपूरात प्रसिद्ध होती. मोवाड हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे. मोवाड हे नरखेड तालुक्यातील गाव असून वर्धा नदीच्या काठावर हे गाव आहे. रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पाऊस झाला( heavy rain throughout the night ). नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते ( river and canals overflowing ). दिवस उजडण्या आधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झाले होते. कुणालाही सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्यादिवशी पाहिल्यांदा मोवाडवासीयांनी वर्धा नदीचे रोद्र रूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र १९९१ च्या महापूराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत. खवळलेल्या नदीने हजारोंच्या डोळ्यादेखत आपल्या स्नेही जणांना महापुराने कवेत घेत असल्याचे दृश्य आजही अनेकांच्या मनात ताजे आहे.

काही तासात होत्याचे नव्हते झाले - एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्होते केले होते. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या घटनेत मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात.

मोवाड होते सोन्याचे कवाड - मोवाड नगरपालिकेची स्थापना १७ मे १८६७ ला झाली. त्याला १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. येथील नगरपरिषद,स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास,चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडचा विणकरांची मोठी बाजारपेठ होती, सोबातचं इथली बैलबाजार देखील प्रसिद्ध आहे. येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे, मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे.

मोवाडवासी पाळणार काळा दिवस - महापूरामुळे जिवनाची घडी बिस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येते. या विनाशाला तब्बल ३१ वर्षे पूर्ण होत असल्याने काळाने झडप मोवाडवासीयांवर घातली आणि निश्पाप २०४ लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून ३० जुलै रोज शनिवार काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. ती काळरात्र वैऱ्याची ठरली. मृतदेहाचा सडा तिन - चार किलोमिटर पर्यत पडला होता. प्राणहाणी, वित्तहाणी मोठ्या प्रमाणात झाली होती, आरडा-ओरड आणि किंचाळ्याने आसमंत दणाणले होते. क्षणात संपूर्ण गाव नेस्तानाभुत झाले.

हेही वाचा - Cloudburst Like Rain Satara: सातार्‍यातील वाई, जावळी तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस; वेण्णा चौकाला तलावाचे स्वरूप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.