नागपूर - शहरात सोमवारी दिवसभरात तीन कोरोना रुग्णांची भर पडली, तर तिघांनी कोरोनाव यशस्वीपणे मात केली. तसेच एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९८ वर पोहोचली आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १०० वर असलेल्या रुग्ण आता ३०० च्या जवळपास पोहोचले आहे. ४ दिवसांपूर्वी पार्वती नगर परिसरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करून फवारणी करण्यात आली. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. हे रुग्ण मोमीनपुरा परिसरातील असून त्यांना आधीच क्वारंटाईन केले होते.
एकीकडे कोरोना बधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील समाधानकारक आहे. सोमवारी नागपुरात 3 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एक 50 वर्षीय पुरुष, 60 व 17 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नागपुरातील कोरोनाची सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २९८
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ९३
मृत्यू - ०३