नागपूर - महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक 3 महिने पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर महानगर पालिकेचीही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेमुळे काम करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर यांना कमी कालावधी मिळाला. त्यामुळे काही काळ मुदतवाढ मिळावी, अशी मागणी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे केली होती.
त्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक 3 महिने पुढे ढकलण्यात आली आहे. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांची 5 सप्टेंबरला मुदत संपणार होती. मात्र, त्यांना सरकारच्या या निर्णयाने 3 महिने मुदतवाढ मिळाली आहे. आता 3 महिन्यात महिलांसाठी राहीलेले प्रकल्प पूर्ण करणार असून उर्वरित सर्व कार्य मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नंदा जिचकार यांनी सांगितले.