नागपूर - जिल्ह्यात मागील अडीच महिन्यांपासून सातत्याने कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यात मागील काही दिवसात मृतांचा आकडा वाढल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. गेल्या पाच दिवसात 19 हजार नविन बाधितांची भर पडली असून 286 जणांचा मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यात झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान 286 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. याच पाच दिवसात 19 हजार 87 बाधितांची भर पडली.
- 1 एप्रिल 60 जणांचा मृत्यू, 3 हजार 630 बाधित रूग्ण
- 2 एप्रिल 60 जणांचा मृत्यू, 4 हजार 108 बाधित रूग्ण
- 3 एप्रिल 47 जणांचा मृत्यू, 3 हजार 720 बाधित रूग्ण
- 4 एप्रिल 62 जणांचा मृत्यू, 4 हजार 110 बाधित रूग्ण
- 5 एप्रिल 57 जणांचा मृत्यू, 3 हजार 519 बाधित रूग्ण
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये नागपुरात 3 हजार 519, भंडारा 656, चंद्रपूर 265, गोंदिया 253, वर्धा 314 बाधित असून गडचिरोलीमध्ये सर्वाधिक कमी 79 बधितांची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भात कोरोनाने 76 जण दगावले आहेत. तर, 4 हजार 670 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.
हेही वाचा - LIVE UPDATE : राज्यातील कोरोनासंदर्भातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर