नागपूर - संपूर्ण राज्यात कोरोना आणि ओमयक्रॉन बाधित रुग्णांची संख्या धोकादायकरित्या वाढत आहे. ( Omicron Patients Increasing In Maharashtra ) कोरोना बाधितांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सची संख्या फार मोठी आहे. नागपूर पोलीस दलातील २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची आहे. ( Nagpur Police Department Corona News ) सर्व कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तब्येत ठणठणीत असल्याने त्यांना होम आयसोलेशन ठेवण्यात आल्याची माहिती नागपूर पोलीस विभागाचे वैद्यकीय अधिकारी संदीप शिंदे यांनी दिली आहे. ( Dr. Sandip Shinde Medical Department Nagpur Police ) तर आजपासून नागपूर शहर पोलीस दलातील पोलिसांना लसीचा बूस्टर डोस देण्यास शुभारंभ करण्यात आला आहे. ( Booster Dose Nagpur Police )
गेल्यावर्षी लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती. त्यावेळी फ्रंटलाईन वर्कर म्हणून नागपूर पोलीस दलातील तब्बल ९७ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला आहे. गेल्या पाच दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या २६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. यामध्ये 21 कर्मचारी आणि 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना बधितांच्या कुटुंबाची होणार चाचणी -
गेल्या पाच दिवसात नागपूर पोलीस दलातील 21 कर्मचारी आणि 5 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Corona in Nagpur : पालिका रुग्णलायतील सगळे बेड कोरोना बधितांसाठी राखीव - महापौर तिवारी
पोलीस कर्मचाऱ्यांना आजपासून बूस्टरचे कवच -
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार फ्रंटलाईन वर्कर्सला कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू झाली आहे. मात्र, आजपासून नागपूर पोलीस दलातील ज्या कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांना बूस्टर डोसचे कवच दिले जात आहे. याकरिता ड्युटी सांभाळून कर्मचारी लस घेण्यासाठी उत्साहाने पुढे येत असल्याचे चित्र बघायला मिळाले.