नागपूर : शहरात कोविडनंतर प्रथमच दोन वर्षानंतर हिवाळी अधिवेशनाला ( Winter session in Nagpur ) सोमवार पासून सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनाची हाक पुकरण्यात आली आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून विविध मागण्यांसाठी तब्बल 11 मोर्चे काढण्यात येणार आहेत.
विविध संघटनांकडून 11 मोर्चे :
स्वतंत्र मजदूर युनीयनचा मोर्चा : या संघटनेद्वारे 1000 महिला व पुरूषांना सोबत घेऊन यशवंत्त स्टेडीयम येथून मोर्चा निघून गुंज चौक,आंनद टॉकीज लोखंडी पूल, मानस चौक ते स्टॉपिंग पॉईंट टेकडी रोड दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे.
हिंदू जनजागृती समिती : या संघटनेद्वारे 5000 महिला व पुरूषांना सोबत घेऊन यशवंत स्टेडीयम येथून मोर्चा निघून मंजे चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी टॉकीज, स्टॉपिंग पॉईंट ते मॉरिस कॉलेज चौक पर्यंत निघणार आहे.