ETV Bharat / state

नागपूर मेट्रोला यंदाच्या तापमानाचा फायदा; तब्बल १ लाख युनिट सौरऊर्जेची निर्मिती

नागपूर मेट्रो सर्वात पहिली ग्रीन मेट्रो आहे. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोला लागणाऱ्या वीजेपैकी ६५ टक्के वीज मेट्रोद्वारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजेच्या बचतीसोबतच प्रदुषणावरही नियंत्रण राहणार आहे.

महामेट्रो
author img

By

Published : Jun 26, 2019, 1:01 PM IST

Updated : Jun 27, 2019, 3:33 PM IST

नागपूर - शहरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता. याचाच सदुपयोग करत नागपूर मेट्रोने तब्बल १ लाख युनिट सौरऊर्जेची निर्मिती केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होणार आहे.

मेट्रोच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना महामेट्रोचे अधिकारी

नागपूर मेट्रो सर्वात पहिली ग्रीन मेट्रो आहे. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोला लागणाऱ्या वीजेपैकी ६५ टक्के वीज मेट्रोद्वारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजेच्या बचतीसोबतच प्रदूषणावरही नियंत्रण राहणार आहे. यासाठी महामेट्रोने खापरी स्टेशनवर २०९, न्यू एयरपोर्टला ३४६, एयरपोर्ट साऊथला ४०७, तर एयरपोर्ट स्टेशनला ५४० सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. यासोबतच मेट्रो भवन येथे ८४० सोलर पॅनल बसवले आहे. आतापर्यंत मेट्रोद्वारे एकूण २ हजार ३४२ सोलर पॅनल बसवले आहे. त्याद्वारे फक्त मे महिन्यात १ लाख ४ हजार ३०७ युनिट सौरऊर्जेची निर्मिती करण्यात आली आहे. लवकरच इतर स्टेशनदेखील तयार होणार आहेत. त्याठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.

Intro:नागपूरचे जीवघेणे तापमान सर्वाना नको- नको से वाटत असले तरी महामेट्रोला वाढीव तापमान हवे- हवे वाटत आहे...नागपूरच्या तापमानाचा सर्वांनाच फटका बसला असला तरी महा मेट्रो नागपूरने मात्र या काळात 1 लाख युनिट सौर उर्जेची निर्मिती करत मोठ्या प्रमाणात वीज बचत केली....या वर्षी नागपूरच्या तापमानेने उच्चांक गाठला होता,त्या तापमानाच्या जोरावर महा मेट्रो ने सौर ऊर्जा साठवली आहे
Body:आरोप- प्रत्यारोपाच्या फेऱ्यात अडकलेली माझी मेट्रो सौर ऊर्जेची वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत देशात अव्वल आली आहे....नागपूर मेट्रोला देशातील सर्वात पहिली ग्रीन मेट्रो असल्याचा बहुमान प्राप्त आहे...नागपूर मध्ये होणारी मेट्रो ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्मार्ट मेट्रो होणार असली तरी या मेट्रो च वैशिष्टय म्हणजे मेट्रो ला लागणाऱ्या विजेचा 65 टक्के वीज मेट्रो स्वतःहा सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करणार आहे... त्यामुळे विजेच्या बचतीसोबत प्रदूषणावर देखील नियंत्रण येणार आहे...महा मेट्रो ने खापरी,न्यू एयरपोर्ट,एयरपोर्ट साउथ आणि एयरपोर्ट स्टेशन येथे अनुक्रमे २०९,३४६,४०७ आणि ५४० सौर पॅनल बसविले आहे. हे ४ स्टेशन मिळून एकूण १५०२ सोलर पॅनल मेट्रो ने बसविले आहेत. यासोबतच मेट्रो भवन येथे देखील ८४० सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. याप्रमाणे मेट्रो ने आतापर्यंत एकूण २३४२ सोलर पॅनलची स्थापना ४ स्टेशन आणि मेट्रो भवन येथे केली आहे. फक्त में महिन्यात ४ स्टेशन आणि मेट्रो भवन मिळून १०४३०७ युनिट एवढ्या विजेची निर्मिती महा मेट्रोने केली.... नागपूर ची गर्मी त्रासदायक असली तरी या गर्मीचा सदुपयोग करत मेट्रो ने वीज निर्मिती करत एक आदर्श निर्माण केला आहे...लवकरच इतर स्टेशन सुद्धा तयार होणार असून त्या ठिकाणी सुद्धा सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत,ज्यामुळे 65 टक्के मेट्रोचे संचालन हे सौर ऊर्जेवर चालवणे आणखी सुलभ होईल

बाईट -- अनिल कोकाटे, अधिकारी महामेट्रो
Conclusion:
Last Updated : Jun 27, 2019, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.