ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद, आज 256 नवीन रुग्ण - मुंबई कोरोना शून्य मृत्यू नोंद

मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद होत होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ( Zero Death Recorded Second Time )

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 11, 2021, 8:39 PM IST

मुंबई - राज्यासह मुंबईत मागील पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. ( Corona In Maharashtra ) या कालावधीत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्यावर मात करण्यात मुंबई मनपाला यश आले आहे. ( Mumbai MNC Over Corona ) पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे. गेल्या पावणे दोन वर्षात आज दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ( Zero Death Recorded Second Time ) तर आज कोरोनाचे 256 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद होत होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

हेही वाचा - Omicron In Mumbai : मुंबईत 11 आणि 12 डिसेंबरला जमावबंदीचे आदेश, राज्यात 7 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण

आज 256 नवे रुग्ण -

आज 11 डिसेंबरला 256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 65 हजार 110 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 44 हजार 370 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1808 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2592 दिवस इतका आहे. मुंबईमधील 11 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.