ETV Bharat / state

Mumbai Crime News : दिंडोशीत लग्नास नकार दिला म्हणून तरुणीवर चाकूहल्ला - मुंबईतील दिडोशी परिसरात

मुंबईतील दिडोशी परिसरात तरुणीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने पीडितेच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार केले. (woman Attack by Knife for refusing to marry). या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आयपीसी कलम 307, 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली. (woman Attack by Knife in Dindoshi Mumbai).

Crime
Crime
author img

By

Published : Dec 30, 2022, 10:45 PM IST

मुंबई : पश्चिम उपनगरातील दिंडोशी परिसरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिला म्हणून २४ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने चाकूहल्ला केला. (woman Attack by Knife for refusing to marry). या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रमिशा उंडारे असे या जखमी तरुणीचे नाव असून तरुणीवर शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली आहे. (woman Attack by Knife in Dindoshi Mumbai).

आरोपी प्रियकराला अटक : काल सायंकाळी पीडित तरुणी ही दुर्गावाडी चाळ, देवीपाडा नॅशनल पार्कजवळ बोरिवली येथून कामावरून घरी जात होती. त्यावेळी आरोपी राजेंद्र परब याने तरुणीची वाट अडवून लग्नाची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिल्याने आरोपीने पीडितेच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार केले. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आयपीसी कलम 307, 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी परब याला पोलिसांनी अटक केली.

तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात : पीडित तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहात असून पूर्वी दोघांमध्ये मैत्री होती. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. प्रमिशा आपल्यासोबत बोलत नसल्याने राजेंद्र याला राग अनावर झाला होता. तो प्रमिशाकडे वारंवार लग्नाची मागणी करत होता. मात्र, प्रमिशा त्याच्याकडे कानाडोळा करत होती. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास प्रमिशा ही बोरिवली येथून कामावरून घरी परतत होती. दुर्गावाडी चाळ, देवीपाडा नॅशनल पार्कजवळ प्रमिशा आली असता आरोपी राजेंद्र याने तिची वाट अडवली. त्यावेळी आरोपी राजेंद्र परब याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. त्यावेळी प्रमिशाने त्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात प्रमिशा गंभीररित्या जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमिशाने दिलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपी राजेंद्र विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.