ETV Bharat / state

Mumbai Crime : मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित? विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला चार तासात अटक - मुंबईची लाईफ लाईन

दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार, बलात्कार, खून अशी प्रकरणे वाढतच चालली आहेत. सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान मुंबई-पनवेल लोकलमध्ये बुधवारी सकाळी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला चार तासात अटक झाली आहे. नवाजू करीम शेख (४०) असे या आरोपीचे नाव आहे.

Mumbai Crime
आरोपी नवाजू करीम शेख
author img

By

Published : Jun 16, 2023, 5:38 PM IST

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात आरोपीने मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर केवळ चार तासातच आरोपीला अटक केली आहे. नवाजू करीम शेख (वय 40) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दहा दिवसात आरोपपत्र दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात खटला लढणार असल्याचे लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे.

पाच महिलांबाबत लैंगिक छेडछाड : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक येथे आरोपी नवाजु शेख याने एक नाही तर, इतर चार अशा एकूण पाच महिलांबाबत लैंगिक छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला. आरोपीला घटनेनंतर चार तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान 14 जूनला सकाळी 7.28 वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ट्रेनच्या डब्यात लैंगिक अत्याचार केला : पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात शिरला. मुलगी एकटीच प्रवास करत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला.

शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न : लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजला जाण्यासाठी सकाळी सहा वाजून 26 मिनिटांच्या लोकलमधून पीडित मुलगी महिलांसाठीच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. सकाळची वेळ असल्यामुळे महिला डब्यामध्ये विशेष प्रवासी नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने महिला डब्यात प्रवेश केला. दारूच्या नशेतील तरुणाने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अवघ्या चार तासात मशीद बंदर रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News लोकलमध्येही महिला सुरक्षित नाही लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला घटनेच्या 8 तासांनंतर अटक
  2. Buldana Crime सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  3. Mumbai Crime News खळबळजनक आर्थर रोड कारागृहात दोन कैद्यांकडून सहकाऱ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.