ठाणे : ठाणे (Latest news from Thane) जिल्हातील कसारा ग्रामीण पोलिसांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कसारा नजीकच्या जंगल भागातील रस्त्याच्या कडेला सुमारे २१-२५ वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून (Young girls body found) आल्याची माहिती कसारा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दिली होती. (Thane Crime) त्यातच ५ जानेवारी रोजी मुंबई आग्रा महामार्गा जवळ कसारा नजीकच्या वारलीपाडा गावातील जंगलात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह एका प्रवाशाच्या नजरेस पडला होता. (young girl murder case Thane) त्यानंतर त्याच प्रवाशाने मृतदेहा विषयी माहिती कसारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत तरुणीचा मृतदेह (murder case registered against killer) शहापूरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.
मोबाईलमुळे पटली मृत तरुणीची ओळख : तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या अनेक जखमा पोलिसांना आढळून आल्या. त्यानंतर पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून कसारा पोलीस ठाण्यात खून करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाशेजारी मृत तरुणीचा मोबाईल पोलिसांना तपासादरम्यान आढळून आला. मात्र मोबाईल फोन लॉक असल्याने खबरदारी म्हणून मोबाईलमधील डाटा सुरक्षित कसा काढता येईल यासाठी मोबाईल तज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक ओपन केल्याने मृत तरुणीची चार तासात ओळख पटली होती.
फुटेजवरून पटली आरोपीची ओळख : त्यानंतर कसारा प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप गितेसह पोलीस उपनिरीक्षक सलमान खतिब पोना. दांडेकर, बावधने ,तिडके, निवळे खादे ,चौधरी ,पो.ह. साहिल यांचे विशेष पथक आरोपीच्या शोध घेण्यासाठी नेमण्यात येऊन या पोलीस पथकाने घटनांच्या दिवसापासून मुंबई आग्रा महामार्गवरील ५ ते ६ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यामधील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृतक तरुणी आरोपी रिजवान आणि अर्शद सोबत दिसून आली होती. त्यानंतर फुटेजवरून आरोपीची ओळख पटवून त्यांचा शोध सुरु केला असता. ते दोघेही भिवंडीत राहणारे असून सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.
वर्षभरापासून राहत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये : कसारा पोलिसांच्या पथकाने स्थानिक भिवंडी पोलिसांची मदत घेऊन दोन्ही आरोपीना भिवंडी शहरातील अवचित पाडा भागात शिताफीने सापळा रचून अटक केली. अटक केलेल्या आरोपी पैकी रिजवान सोबत मृत तरुणी गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भिवंडीत राहत होती. त्यातच गेल्याकाही दिवसापासून लिव्ह इन रिलेशनमधूनच दोघांमध्ये लहानसान वादातून खटके उडायचे, त्यामुळे आरोपी प्रियकर रिजवानने तरुणीच्या हत्येचा कट त्याचा मित्र अर्शदशी संगनमत करून रचला होता.
फिरण्याच्या बहाण्याने आणून केली निर्घृण हत्या : ठरल्याप्रमाणे घटनेच्या दिवशी मृत तरुणीला फिरण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून वारलीपाडा गावातील जंगलात जाणाऱ्या रस्त्यावर आणले. त्यानंतर याच ठिकाणी तिच्यावर चाकूने अनेक वार करून तिची निर्घृण हत्या करून दोघेही घटनस्थळावरून पसार झाले होते. मात्र कसारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोपीना २४ तासातच शिताफीने शोध घेऊन भिवंडीतून अटक केल्याची माहिती कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास कसारा पोलीस करीत आहेत.