ETV Bharat / state

'राजकारणातलं युवा पर्व; मात्र घराणेशाहीतलेच सर्व', सामान्य कार्यकर्ता अद्यापही वंचितच - ghraneshahi

राज्यात अनेक ठिकाणी युवा चेहरे राजकारणात आपले भविष्य आजमावू पाहत आहेत. तर काही जण राजकारणात सक्रिय झाले आहेत. मात्र, हे युवा चेहरे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातलेच आहेत. सर्वसामान्य कुटुंबातल्या युवा चेहऱ्यांना केव्हा संधी मिळणार हा खरा चिंतणाचा विषय आहे.

राजकारणात युवा पर्व
author img

By

Published : Sep 19, 2019, 12:01 PM IST

Updated : Sep 19, 2019, 1:00 PM IST

मुंबई - 'राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा', असे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. मात्र, गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोखरल्याचे चित्र दिसत आहे. राजकारणामध्ये वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला कधीच मोठी पदे येत नाहीत. तर ती राज्यकरत्यांच्या नात्यागोत्यातच राहतात. राज्यात अनेक ठिकाणी युवा चेहरे राजकारणात आपले भविष्य आजमावू पाहत आहेत. तर काही जण राजकारणात सक्रिय झाले आहेत. मात्र, हे युवा चेहरे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातलेच आहेत. सर्वसामान्य कुटुंबातल्या युवा चेहऱ्यांना केव्हा संधी मिळणार हा खरा चिंतणाचा विषय आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार, दौरे, गाठी भेटींना सुरुवात केली आहे. अनेकजण आपापल्या मतदारसंघावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करताहेत, तर काही जण आपला मुलगा, मुलगी, नातेवाईक राजकारणात आणून घराणेशाही बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहुया कशी फोफोवतेय राज्याच्या राजकारणातील युवा घराणेशाही....

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला आमदार, खासदार बनवले. त्यांनी स्वत: कधीही निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब ठाकरेनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आली. त्यानंतर आता त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हेही राजकारणात सक्रिय झाले आहेत. जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. सध्या ते कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या विररोधात ते निवडणूक लढवणार आहेत. रोहित पवारांच्या रुपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता रोहित पवार हे पुढे आले आहेत.

नितेश राणे
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे प्रमुख खासदार नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे हेदेखील राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. कोकणातील एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नारायण राणे यांच्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे हे खासदार झाले होते. मात्र, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तर दुसरे पुत्र आमदार नितेश राणे हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत. राणेंची दोन्ही मुले राजकारणात आल्याने कोकणातही राजकारणामध्ये घराणेशाही असल्याचे दिसते.

आदिती आणि अनिकेत तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे रागयगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरातही घराणेशाही फोफावली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांची मुलगी आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. पुत्र अनिकेत तटकरे हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तटकरे यांचे बंधु अनिल तटकरे हे विधान परिषदेचे आमदार तर त्यांचे पुत्र अवधूत तटकरे हेदेखील रोह्याचे आमदार होते. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन नुकताच शिवसेनेते प्रवेश केला आहे.

विश्वजीत कदम
महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम हेदेखील राजकारणात स्थिर होताना दिसत आहेत. त्यांनी २०१४ साली पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनतर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव मदरासंघातून विश्वजीत कदम हे बिनविरोध आमदार झाले. त्यांच्या रुपाने सांगली जिल्ह्यातही घराणेशाही वाढत आहे.

प्रणिती शिंदे
देशाची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात घराणेशाही वाढत आहे. त्या सध्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार आहेत. दोन वेळा त्या विधानसभेला निवडून आल्या आहेत. यावेळीही त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत.

धीरज देशमुख
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हेही यावेळी विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. विलासरावांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख हे सध्या आमदार आहेत. मात्र, आता धीरज देशमुख हेही राजकारणात सक्रिय होत आहेत. त्यांच्या माध्यमातून लातूरात घराणेशाही वाढत आहे.

सुजय विखे पाटील
सुजय विखे पाटलांच्या रुपाने विखे पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात आली आहे. नगर जिल्ह्यात विखे कुटुंबीयांचे बडे प्रस्थ आहे. सुरुवातीला बाळासाहेब विखे पाटील त्याच्यानंतर त्यांचे पुत्र सध्या मंत्री असललेले राधाकृष्ण विखे पाटील आणि आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील अशी विखेंची घराणेशाही आहे.

संतोष दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत. ते सध्या आमदार आहेत.

आकाश फुंडकर
भाजपचे दिवंगत नेते पाडुंरंग फुंडकर यांचे आकाश फुंडकर हे पुत्र आहेत. आकाश यांच्या रुपाने बुलडाण्यातही घराणेशाही पाहायला मिळत आहे.

अंकिता पाटील
सध्याच भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील या सुद्धा राजकारणात काम करत आहेत. त्या सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. अंकिता पाटील यांच्या रुपाने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे.

सत्यजीत तांबे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे देखील राजकारणात सक्रीय असून ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हातात आली आहे. तसेच सत्यजीत यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत.

अमित ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेही राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. त्यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

संदिप क्षीरसागर
बीडच्या राजकारणातील मोठे नाव म्हणजे क्षीरसागर कुटुंब. या कुटुंबामध्ये सध्या फुट पडली आहे. नुकताच बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथून आता राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे काका पुतण्यात लढत होणार हे मात्र, निश्चित. संदीप क्षीरसागर यांच्या रुपाने क्षीरसागर कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात आपले भविष्य आजमावत आहे.

ऋतुराज पाटील
ऋतुराज पाटील यांच्या रुपाने कोल्हापूरच्या राजकारणात पाटील कुटुंबाची तिसरी पिढी स्थिर होत आहे. डी. वाय. पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र सतेज पाटील हे आमदार, मंत्री राहिले आहेत. तर आता सतेज पाटलांचे पुतणे हे काल्हापूर दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

अजिंक्यराणा पाटील
सोलापूरच्या राजकारणात पाटील कुटुंबाची घराणेशाही फोफावत आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्यराणा पाटील हे सध्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचे बंधु बाळराजे पाटील हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. पाटील कुटुंबातही घराणेशाही वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

जयदत्त धस

विधनापरिषदेचे आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस हे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ते सध्या मतदारसंघात दौरा करत आहेत. त्यांच्या रुपानेही घराणेही पुढे येत आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.