मुंबई : उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काल मुंबईत दाखल ( Yogi Adityanath participate Global Investor Summit ) झाले. आज त्यांनी मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योग समूहांची संवाद साधला. उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणण्याबाबत मुंबईत त्यांनी यशस्वी रोड शो केला. मुंबईतील ताजमहल, कुलाबा या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा रोडशो आयोजित करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण : मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईतील हॉटेल ताजमध्ये पुढील महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी संवाद ( Yogi Adityanath participate Global Investor Summit ) साधला. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाबाबत योगी आदित्यनाथ हे कटिबद्ध असून २०१७ नंतर उत्तर प्रदेशमध्ये झालेले बदल त्यांनी यावेळी सांगितले. उत्तर प्रदेशची आत्मनिर्भर्तेकडे दमदार वाटचाल सुरू असून उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बँकर्स, उद्योगपतींबरोबर बैठक : उद्योगपतीबरोबर संवाद करण्याअगोदर योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील बँकर्सबरोबर एक बैठक ( Meeting with bankers in Mumbai) घेतली. यामध्ये राज्यातील तसेच देशातील नामांकित बँकांचे संचालक उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री नंद गोपाल गुप्ता, यांच्यासह एसबीआय, एसटीडीबीआय, केकेआर, स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक, एस बँक, आयडीबीआय बँक, इंडिया एक्झिम बँक, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्विस लिमिटेड यासारख्या बँकांचा समावेश होता.
मोठे उद्योगपती उपस्थित : गुंतवणूकदारांबरोबर झालेल्या बैठकीत टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, महिंद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया, जीएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिताची, हिरानंदानी, कोकाकोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड, ओसवाल इंडस्ट्रीज सह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि जेष्ठ उद्योगपती उपस्थित ( Yogi Adityanath interact with big industrialists ) होते. याप्रसंगी हिरानंदानी समूहाचे सीईओ चेतन हिरानंदानी यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात उत्तर प्रदेशात केलेल्या गुंतवणुकीचे कसे अनुभव आले हे सांगत उत्तर प्रदेश आता झपाट्याने पुढे जात असल्याचे सांगितले आहे.
उत्तर प्रदेश बदलला आहे : रोड शोच्या समारोप भाषणात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, करोना मध्ये आम्ही चांगले काम केले. इंडस्ट्री बंद होऊ दिली नाही. व्यावसायिक चैन थांबवली नाही. उत्तर प्रदेशात ९६ लाख एमएसएमयू युनिट आहेत. आम्ही व्यावसायिक गुंतवणूकदारांना योग्य मदत करतो. ४ लाख करोडचे एमओयू आम्ही प्रतक्षात आणले आहेत. तसेच आमच्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे.
उत्तर प्रदेशला येण्याचे आमंत्रण : आमच्या येथून नेपाळ ५५० किलोमीटर आहे. तसेच बिहार, झारखंड, दिल्ली या सोबत आमची कनेक्टिव्हिटी योग्य आहे. राजधानी लखनौ येथून सर्व प्रमुख राज्यांना जोडण्यासाठी एक्स्प्रेस व्हे तयार आहेत. १६ हजार किलोमीटरचा रेल्वे मार्ग उत्तर प्रदेश मध्ये आहे. ९ एअरपोर्ट कार्यरत आहेत. १० वर काम चालू आहे. ५ लवकरात लवकर चालू होत आहेत. हळदिया ते वाराणसी पहिला वॉटर वे उत्तर प्रदेश मध्ये आहे. ७ लाख १२ हजार करोड चे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. व आम्ही त्यावर काम चालू केले आहे. मी घरात आमंत्रण देण्यासाठी आलो आहे, असे सांगत तुम्ही एकदा एमओयू मंजूर केला की तुम्हाला काही चिंता नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्व गोष्टींवर लक्ष ठेवले जाईल. उत्तर प्रदेश सारखा मोठा बाजार तुमच्या समोर आहे, असेही योगी म्हणाले. मोदी यांचे स्वप्न भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर बनवण्याचे ( India economy will become 5 trillion dollars ) आहे. तर त्याचा रस्ता उत्तर प्रदेश मधून जातो, असे सांगत मी तुम्हाला आमंत्रित करत ( invitation to businessman for investment ) आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.