ETV Bharat / state

Worli Sea Face Accident: वरळी अपघात प्रकरण; वाहनचालकाला आज न्यायालयात करण्यात येणार हजर

author img

By

Published : Mar 20, 2023, 10:45 AM IST

वरळी सीफेसवरुन भरधाव वेगाने जात असलेल्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 58 वर्षीय राजलक्ष्मी रामकृष्णन यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून राजलक्ष्मी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन वरळी पोलीसांनी आरोपी कार चालक सुमेर मर्चंट (23) याला अटक केली आहे. सुमेर याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याने मद्यसेवन केले होते का, हे अहवालानंतर स्पष्ट होईल असे पोलीसांनी सांगितले.

Worli Sea Face Accident
वरळी सीफेस अपघात प्रकरण

मुंबई : माटुंगामधील रहिवासी असलेल्या राजलक्ष्मी या एका खासगी तंत्रज्ञान कंपनीच्या सीईओ होत्या. फिटनेस फ्रीक म्हणूनही त्यांची ओळख होती. शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपच्या त्या एक भाग होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी त्या जाॅगिंगसाठी वरळी सीफेसवर गेल्या होत्या. साडेसहाच्या सुमारास वरळी डेअरी जवळ त्यांना भरधाव वेगाने आलेल्या टाटा नेक्साॅन ईलेक्ट्रीक कारने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, राजलक्ष्मी या काही अंतर लांब फेकल्या गेल्या. स्थानिकांकडून या अपघाताची माहिती मिळताच वरळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत राजलक्ष्मी यांना तात्काळ उपचारांसाठी पोद्दार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टारांनी त्यांना मृत घोषीत केले.

सुमेरला अटक: राजलक्ष्मी यांना धडक दिल्यानंतर कारची धडक दुभाजकाला होऊन कारचा चक्काचूर झाला. तसेच, अपघाताच कार चालक सुमेर हा जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय चाचणीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन वरळी पोलीसांनी सुमेर याला अटक केली आहे. ताडदेवमधील रहिवासी असलेला सुमेर हा मैत्रिणीला सोडायला गेला होता. तेथून भरधाव वेगाने परतत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारची राजलक्ष्मी यांना मागून धडक बसली. त्यानंतर कार दुभाजकाला धडकल्याचे पोलीसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सरकारी मालमत्तेचे नुकसान: रविवारी सकाळी 6.05 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाव्दारे संदेश मिळाला की, वरळी सी-फेस व्हिनस गल्ली उत्तर वाहीनीवर एका मोटार कारने एका महिलेस धडक दिली आहे. त्यानुसार संदेश मिळताच वरळी मोबाईल ०१ व मोबाईल ०५ अशा त्वरीत पहाणी करत भगवान अपार्टमेंट समोर, व्हिनस गल्ली बस स्टॉपजवळ, खान अब्दुल गफारखान रोड, उत्तर वाहीनी वरळी सी-फेस, वरळी या ठिकाणी पोहचल्या असता, सुमारे 6.30 वाजताच्या दरम्यान मोटार वाहन टाटा नेक्सन सफेद रंगाची क्र. MH 01 DX 5850 चा वाहन चालक सुमेर धर्मेश मर्चंट, वय २३ वर्ष याने त्याच्या ताब्यातील मोटार वाहन भरधाव वेगात चालविल्याने एखद्या व्यक्तीचा मृत्यू होवू शकतो याची जाणीव असतानाही अशा प्रकारे चालवून राजलक्ष्मी विजय रामकृष्णन, वय ५८ यांना धडक देवून त्यांचा मृत्यू घडवून आणून रस्ता दुभाजकास धडकून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

वैद्यकीय तपासणी : या घटनेबाबत वरळी पोलीस ठाणे येथे अपमृत्यू नोंद करून अटक आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४, मोटार वाहन कायदा कलम १८४ सह सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. नमूद गुन्हयातील आरोपी सुमेर धर्मेश मर्चंट, वय २३ वर्षे, यास त्याची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आलेली आहे. या गुन्हयातील आरोपीचे वाहन आरटीओ तपासणीकरीता ताब्यात घेण्यात आलेले आहे. अटक आरोपीला रिमांडसाठी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Worli Sea Face Accident मॉर्निंग वॉक करणाऱ्या कंपनीच्या सीईओ महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू चालकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.