ETV Bharat / state

BDD Chal Redevelopment Project : बीडीडी प्रकल्प; येत्या दोन वर्षात १ हजार ७०० घरे  होणार उपलब्ध

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी प्रकल्पातील ( BDD Chal Redevelopment Project ) रहिवाशांना आता आशेचा किरण दिसला आहे.पुढील दोन वर्षांत वरळी ( Worli BDD Chal Redevelopment Project ) येथे १७०० घरांची निर्मिती होणार असल्याची माहिती प्रकल्प अभियंते रावल यांनी दिली आहे.

BDD Chal Redevelopment Project
BDD Chal Redevelopment Project
author img

By

Published : Nov 21, 2022, 7:35 PM IST

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास ( Worli BDD Chal Redevelopment Project ) प्रकल्पातील सहा इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली ( Worli BDD Chal construction started ) आहे. या पुनर्वसन इमारतींमध्ये प्रत्येकी ५०० चौरस फुटांच्या १७०० घरे निर्माण केली जाणार आहेत. इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा दावा म्हाडाचे कार्यकारी अभियंता धात्रक यांनी केला आहे.

वरळी बीडीडी प्रकल्प

काय आहे सद्यस्थिती ? मुंबई मंडळाच्यावतीने ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करीत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे २०२१ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही. ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा भूमीपूजन करून वरळीतील पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली. पुढील ३६ महिन्यांत घराचा ताबा देण्यात येईल, आधीच्या नियोजनानूसार २०२४ अखेरीस इमारतींचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

BDD Chal Redevelopment Project
बीडीडीच्या प्रकल्पात दोन वर्षांनी १७०० घरे उपलब्ध होणार

वरळीत बांधकाम सुरू - सध्या वरळीमध्ये सहा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या सहा पुनर्वसन इमारतींमध्ये ५०० चौरस फुटांच्या १७०० घरांचा समावेश आहे. यापैकी एका इमारतीमधील तीन मजल्याचे आरसीसी काम, तर दोन इमारतींच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन इमारतींच्या बांधकामासही आता सुरुवात झाली आहे. इमारतींचे बांधकाम पुढील ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे रावल यांनी सांगितले. या सहा इमारतींचे काम सुरू असतानाच दुसरीकडे टप्प्याटप्प्याने अन्य इमारती पाडून त्याजागी नव्या इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ना म जोशी मार्गावरील उरलेल्या रहिवाशांचे स्थलांतर - दरम्यान, बीडीडी पुवर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ना. म जोशी मार्ग येथील रहिवाशी स्थलांतरित न झाल्याने प्रकल्प रखडला होता. अखेरीस या रहिवाश्यांवर ९५ अ ची कारवाई करून त्य़ांना काढण्यात येत आहे. येत्या आठवड्यात येथील सर्व रहिवाशी स्थलातरित झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. राज्य आणि म्हाडाने प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्याचा दावा धात्रक यांनी केला आहे.

रहिवाशांची नाराजी कायम - तर या प्रकल्पातील रहिवाशी मात्र अद्यापही नाराज आहेत. म्हाडाची यंत्रणा राजकीय नेत्यांच्या तालावर नाचत असल्याने हा प्रकल्प पुर्णत्वास जाईल याची आता खात्री वाटत नसल्य़ाचे बीडीडी चाळ पुवनर्वसन समितीचे सरचिटणीस तानाजी केसरकर सांगतात. सातत्याने प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही रहिवासी प्रयत्नशील असताना म्हाडा मात्र स्तानिक राजकीय नेत्यांचे ऐकून प्रकल्पात खो घालताना आम्ही आतापर्यंत पाहिले आहे. त्यामुळे आमचा या यंत्रणेवर विश्वास नाही, असे केसरकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.