मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात मुंबईत आढळून येत आहेत. मुंबईत पालिकेच्या आकडेवारीप्रमाणे 5 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या एकूण 433 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी वरळीच्या जी साऊथ विभागात सर्वाधिक म्हणजेच 68 तर भायखळा माझगावच्या ई विभागात 44 रुग्ण आहेत. तर सर्वात कमी म्हणजे फक्त 4 रुग्ण डोंगरी पायधुनीच्या बी विभागात आहेत. मुंबई महापालिकेने 24 विभागानूसार दिलेल्या आकडेवारीमधून ही बाब समोर आली आहे.
मुंबईत वरळी, करी रोड, परेल आदी विभाग येत असलेल्या जी साऊथ विभागात सर्वाधिक म्हणजे 68 रुग्ण आढळून आले आहेत. गिरगांव नाना चौक बाबूलनाथच्या डी विभागात 34 रुग्ण आहेत. अंधेरी पश्चिमच्या के वेस्ट विभागात 27, अंधेरी पूर्व मरोळच्या के पूर्व 26, भायखळा माझगावच्या ई विभाग येथे 44, दहिसर पी नॉर्थ येथे 24, संताक्रूझ विलेपार्ले एच ईस्ट येथे 25, चेंबूर नाका घाटला स्टेशन एम वेस्ट येथे 17, मानखुर्द शिवाजी नगर एम ईस्ट येथे 21, घाटकोपर एन विभाग येथे 16, कांदिवली चारकोप आर साऊथ विभाग येथे 12, भांडूप एस विभाग येथे 12, मुलुंड टी विभाग येथे 11, चंदनवाडी सी विभाग येथे 7, गोरेगाव आरे मोतीलाल नगर पी साऊथ विभाग येथे 10, वांद्रे सांताक्रूझ पश्चिम एच वेस्ट विभाग येथे 16, फोर्ट कुलाबा ए 8, कुर्ला एल विभाग 8, सायन कोळीवाडा रावली कॅम्प प्रतीक्षा नगर एफ नॉर्थ विभाग येथे 7, बोरिवली पश्चिम आर नॉर्थ विभाग येथे 6, बोरिवली पूर्व आर सेंट्रल विभाग येथे 7, दादर पश्चिम माहीम धारावी जी नॉर्थ विभाग येथे 9, परेल शिवडी काळाचौकी एफ साऊथ विभाग येथे 5 तर डोंगरी पायधुनी बी विभागात 4 रुग्ण आढळून आले आहेत.