मुंबई - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज कुर्ला लोहमार्ग पोलिसांतर्फे रेल्वे स्थानक परिसरात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांचे गुलाब पुष्प व सुरक्षा माहिती पत्रक देऊन स्वागत करण्यात आले.
रेल्वेतून प्रवास करतांना महिलांनी काळजी घ्यावी, रेल्वे रूळ ओलांडू नये. गाडीच्या दरवाज्यावर उभे राहून मोबाईलवर संभाषण करू नये, चालत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नका, महिला प्रवाशांनी रात्री ९ नंतर पोलीस तैनात असलेल्या डब्यातूनच प्रवास करावा, रेल्वे डब्यात स्थानकात संशयित वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास त्वरित लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा. मदतीसाठी क्रमांक ९८३३३३११११ चोवीस तास उपलब्ध आहे, अशा सूचना यावेळी ध्वनिक्षेपकावरून करण्यात आल्या.