ETV Bharat / state

जगभ्रमंती केलेला भारताचा वास्को-द-गामा 'विष्णूदास चापके' - traveler

विष्णूदास चापकेचा जगसफरीचा अनुभव अनेक रोमांचकारी घटनांनी भरलेला आहे. हा प्रवास त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये उलगडला आहे.

विष्णूदास चापकेचे अभिनंदन करताना ईटीव्ही भारत टीम
author img

By

Published : Mar 27, 2019, 11:59 PM IST

मुंबई - तीन वर्ष कोणत्याही नियोजनाशिवाय जगभ्रमंती करुन भारतात परतलेल्या विष्णुदास चापके यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे. पेशाने पत्रकार असलेल्या विष्णुदासने जगभ्रमंती करण्याचा निश्चय केला आणि तो नेटाने पुर्णही केला. या जगसफरीचा अनुभव अनेक रोमांचकारी घटनांनी भरलेला आहे. हा प्रवास त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये उलगडला आहे.

विष्णूदास चापके यांची मुलाखत

विष्णुदास चापके याने ३ वर्षात ३५ देश आणि ४ खंड पादाक्रांत केले आहेत. २१ मार्चला तो या सफरीवरुन ठाण्यात परतला आहे. या जगाच्या सफरीमुळे तो जगविख्यात भारतीय वास्को-द-गामा झाला आहे, असेच म्हणावे लागेल. कोणतेही नियोजन न करता, जसा मिळेल तसा प्रवास करुन, अनोळखी लोकांकडून मदत मागत, त्यांच्या घरी राहून, प्रसंगी रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहून त्यांने प्रवास केला.

प्रवासासाठी त्याने मुंबईतील घरासाठी जमवलेले सर्व पैसे खर्च केले. वडिलांनी गावची जमीन विकायला काढली. तर मित्रांनीही पैसे जमवून त्याला मदत केली. शेवटी टाटा ट्रस्टने त्याच्या उर्वरित सर्व प्रवासाचा खर्च उचलला. त्यामुळेच तो जगभ्रमंती करुन पुन्हा भारतात आला आहे.

Intro:जगभ्रमंती केलेल्या पत्रकाराशी केलेल्या ह्या खास गप्पा

3 वर्ष 3 दिवस जगाला गोल चक्कर मारुन ठाण्यातील एक पत्रकार ठाण्यात परतला आहे. या 3 वर्षात त्याने 35 देश आणि 4 खंड पालथे घातले. विष्णुदास चापके असं त्याचं नाव असून तो काल (21 मार्च) रोजी ठाण्यात परतला. या जगाच्या सफरीमुळे तो भारतीय मार्को पोलो झाला आहे, असंच म्हणावं लागेल. कारण कोणतेही प्लॅनिंग न करता, जसा मिळेल तसा प्रवास करुन, अनोळखी लोकांकडून लिफ्ट मागत, त्यांच्या घरी राहून, प्रसंगी रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहून त्यांनी हे दिवस काढले. या प्रवासासाठी त्याने मुंबईतील घरासाठी जमवलेले सर्व पैसे खर्च केले. वडिलांनी गावची जमीन विकायला काढली तर मित्रांनीही पैसे जमवून त्याला मदत केली. शेवटी टाटा ट्रस्टने त्याच्या उर्वरित सर्व प्रवासाचा खर्च उचलला. त्यामुळेच तो जग भ्रमंती करुन पुन्हा भारतात आला आहे Body:जगभ्रमंती केलेल्या पत्रकाराशी केलेल्या ह्या खास गप्पा

विष्णुदास चापके. मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचा. चक्क लॉटरीत सिडकोचं घर लागलं होतं त्याला. ...पण ते सोडलं आणि हा वेडा तरुण एका वेड्या स्वप्नामागे निघाला. १९ मार्च २०१६ या दिवशी त्याने घर सोडलं, ते जग पाहायला! खिशात पैसे नाहीत, वाटेतल्या देशांच्या व्हिसाची प्रोसेसबिसेस केलेली नाही. कुठे राहणार माहिती नाही. खर्च कसा भागणार ठाऊक नाही. जमेल तोवर पुढे पुढे जात राहायचं, वाटेत भेटतील त्या माणसांशी दोस्ती करून मिळेल ती मदत घ्यायची, इतकाच प्लॅन! - होण्डुरास नावाच्या देशातून हा लेख लिहिला.तेव्हा विष्णुदासच्या प्रवासाचा 749 वा दिवस होता, आणि आजवर एकूण 17 देश फिरून झाले होते... त्याच्या भन्नाट प्रवासाची ही गोष्ट!! या अशा जगभ्रमंती केलेल्या पत्रकारांशी इटीव्ही भारत मुंबई ब्युरोनि केलेली हि खास त्यांच्याशी चर्चा Conclusion:f
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.