मुंबई - भारतात खराई उटासंदर्भात महत्वाचे संशोधन मुंबई आयआयटीने केले आहे. गुजरातच्या कच्छ भागातील किनाऱ्यावर राहणारे खराई उंट सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात खराई उंटाचे दुध गाईपेक्षा पौष्टिक असल्याचे संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हा उंट कच्छ प्रदेशाच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळतो. खराई ही जगातील उंटांची एकमेव प्रजाती आहे जी पाण्यात पोहते.
जगातील पाण्यात पोहणारे एकमेव उंट भारतात - हे उंट तिथल्या खारफुटीवर कांदळवनावर म्हणजे ज्याला आपण मुंबईमध्ये मॅनग्रोव्ह असे म्हणतो त्याच्यावर ते जगतात. त्यांचं मुख्य अन्न खारफुटी आहे. हे उंट विशिष्ट जातीचे ज्यांना खराई म्हणजे पोहणारे उंट म्हटले जाते. जगामध्ये फक्त कच्छच्याच भागामध्ये हे पोहणारे उंट आहेत. जगात दुसऱ्या ठिकाणी कुठेही नाही. खराई उंटाची जात सध्या नामशेष नष्ट होण्याच्या मार्गावर ( Kharai camel breed is on the verge of extinction ) आहे. त्यामुळे त्या खराई उंटांचा ( Kharai camel research by IIT Mumbai ) विकास तसेच दूधासंदर्भात ( Camel milk is more nutritious than cow milk ) मत्वाचे संशोधन आयआयटी मुंबईने केले आहे.
कच्छच्या समुद्रकिनाऱ्यावरील खराई उंटाची स्थिती - भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कच्छ या भागातील खारफुटीचे पर्यावरण शास्त्र तसेच उंटांना पाळणारे तिथले जे लोक आहेत त्यांना समजून घेण्यासाठी आयटी मुंबईने महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे . खारफुटी कच्छचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खारफुटीमुळे म्हणजेच मँग्रोमुळेच तिथे हे प्रणी तग धरुन आहेत.
विकासाचा परिणाम प्राणी जीवनावर - जगभरातील भरमसाठ लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणावर घातक परिणाम होता आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील अनेक प्रजाती नष्ट होता आहेत. त्याचाच एक परिणाम खराई उंटांवर होतांना दिसून येत आहे. मानवाने केलेल्या विकासाचा परिणाम पर्यावणावर झाल्यामुळे समुद्र किनाऱ्यावर असणारे कांळदवन तसेच त्यावर जगणाऱ्या प्राण्याच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई आयआयटीने खराई उंटावर होणारे परिणाम रोखण्यासाठी महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
खराई उंट नष्ट होण्याच्या मार्गवर - गुजरातमध्ये मुख्यत: खराई उंट पाळण्याचा व्यावसाय केला जातो. या व्यावसायीकांना स्थानिक भाषेत मालधारी असे म्हणतात. ज्यामध्ये रबरी, साम, जाट या उंट पाळणाऱ्या समूहाचा समावेश होतो. कच्छच्या सागरी किनारी प्रदेशात खराई उंटाची प्रजाती राहते. या प्रजातीचे महत्वाचे अन्न तिथले मॅंग्रोव्ह अर्थात किनाऱ्या लगत मिळणी खारफुटी आहे. मात्र, पर्यावरणीय परिणामामुळे या प्रजातीचे अन्न नष्ट होत आहे. अन्न मिळत नसल्याचे खराई उंटावर गंभीर परिणाम होत आहेत.
संयुक्त शोध कार्यातून निष्कर्ष - सहजीवन संस्था, आयआयटी मुंबई, इंग्लंडमधील संस्था तसेच क्यूटो आंतरराष्ट्रीय संस्था याच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबण्यात येत आहे. खराई उंटांच्या संदर्भात यांनी हा प्रकल्प हाती घेऊन संशोधन केले आहे. त्यात त्यांनी कच्च्या भागातील जानेवारी 2020 मध्ये तिथल्या मोहाडी, भानगडी बंद, खराई उंट पाळणाऱ्या खाडी परिसरात वसाहतीमध्ये अनेकदा संशोधकांनी भेटी दिल्या आहेत. या भेटीत संशोधकांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. खारफुटीच्या अन्नावर जगणारे प्राणी हळूहळू नष्ट होतांना संशोधकांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. संपूर्ण खारफुटी नष्ट झाली तर त्याचा गंभीर परिणाम विविध प्रजातीसह मानवाच्या जीवणार होईल असे संशोधकांचे म्हणणे आहे.
खराई उंट का होताय नष्ट - यासंदर्भात मुंबई आयआयटी येथील सेंटर फॉर टेक्नॉलॉजीस, अल्टरनेटिव्ह रुरल एरियाज या विभागातील संशोधक प्राध्यापक डॉक्टर पार्थसारथी यांनी याबाबत ईटिव्हीशी संवाद साधला. "कच्छ भागातील विकासकामामुळे खारफुटी नष्ट होते आहे. 2001 मध्ये भूजमध्ये झालेल्या भूकंपानंतर कच्छ प्रदेशावरही त्याचा मोठा परिणाम झाला होता. गुजरात सरकार देखील विकासकामे करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी समुद्र किनारी बांधकामे वेगाने करण्यात आली. मीठ, सिमेंटचे अनेक कारखाने येथे उभारले गेले त्यामुळे खारफुटी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. “खराईचे उंट कच्छमधील अब्दासा, भचौ, लखपत, मुंद्रा यांसारख्या ठिकाणी आढळतात. या भागात उद्योगधंदे झपाट्याने विकसित होत आहेत. त्यामुळे उंटांना त्यांचे अन्न मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. 'खारफुटी वेगवेगळ्या विकास कामामुळे नष्ट होत आहे.' त्यामुळे तेथील दुध उत्पादनाला देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे संशोधकांचा निष्कर्ष आहे.
उंटाचे दूध गायी पेक्षा पौष्टिक - "उंटापासून अत्यंत चांगल्या पोषणयुक्त घटकांचे दूध मिळते. उंटापासून मिळणारे दूध हे गाईच्या दुधापेक्षा अत्यंत दर्जेदार आहे. ज्यामुळे पोटाचे विकार होत नाही. हे दुध पचनाला अत्यंत सुलभ आहे. मात्र तिथले स्थानिक पर्यावरण जर वाचले तर, उंट वाचतील. त्यासाठी खारफुटीला वाचवणे सर्वाधिक महत्वाचे आहे. खारफुटीचे महत्व सरकार तसेच नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. खारफुटी वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले."
मासेमारीऱ्याचे देखील तेच दुःख - याबाबत मुंबईच्या समुद्रात मासेमारी करणारे नंदकुमार पवार यांनी सांगितले की," ज्या रीतीने खराई उंट खारफुटीवर अवलंबून आहे. त्याच रीतीने मुंबईच्या समुद्रकिनारावर लाखो मासे आपली अंडी जन्माला घालतात. वेगवेगळ्या विकास प्रकल्पामुळे माशांचे जीवन नष्ट होत आहे. पर्यावरणात जर नष्ट झाले तर मासेमारी करणारे लोक देखील एक दिवस नष्ट होतील. शासनाने पर्यावरणाला धक्का न लागता विकासाच्या योजना आखायला हवा."
कांळदवनामुळे समुद्र किनारे वाचले - कांळदवनच्या संवर्धनासाठी काम करणारे रोहित जोशी यांनी ईटीव्ही इंडियाला सांगितले की, "कांळदवन जंगले ही आपल्या मानवी समूहाचे रक्षणकर्ते आहेत. आतापर्यंतच्या सर्व सुनामीतून मुंबई वाचली आहे. पुराच्या काळातही मुंबई वाचली आहे. कारण कांळदवनामुळे समुद्र किनारे वाचु शकले. विकासकामे पर्यावरणीय बदल घेऊन केले पाहिजे."