ETV Bharat / state

World Cup 2023 IND vs SL : वानखेडेवर भारत-श्रीलंका सामना बघायला जाताय, पोलिसांनी दिलेल्या 'या' सूचनांच करावं लागणार पालन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 7:08 AM IST

India vs Sri Lanka match at Wankhede Stadium : मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर आज विश्वचषकातील भारत आणि श्रीलंका याच्यात सामना होणार आहे. सामन्याला होणारी गर्दी पाहता मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांसाठी काही सूचना केल्या आहेत.

World Cup 2023 IND vs SL
World Cup 2023 IND vs SL
सुरक्षेच्या कारणास्तव प्रेक्षकासांठी महत्त्वाच्या सुरक्षा

मुंबई India vs Sri Lanka match at Wankhede Stadium : मुंबईतील वानखेडे स्टेडियनवर आज विश्वचषकातील भारत विरुद्ध श्रीलंका सामना होणार आह. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अशातच राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आणि वानखेडे स्टेडियम साठी मिळणाऱ्या धमक्या, केरळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षा वाढवण्यात आली. यामुळं वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याच्या अनुषंगानं सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी काही महत्वाच्या सूचना प्रेक्षकांसाठी जारी केल्या असल्याचं परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे यांनी सांगितलंय.

साडेअकरा वाजेपासून मिळणार प्रवेश : भारत आणि श्रीलंका सामन्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या सुरक्षा तपासणीमुळं शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि विलंब टाळण्यासाठी प्रेक्षकांनी वेळेआधी स्टेडियम मध्ये पोहोचावं, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळं दुपारी दोनच्या सामन्यासाठी सकाळी साडेअकरा वाजेपासूनच स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलीय.

कोणत्या वस्तू आणण्यास बंदी : वानखेडे स्टेडियममध्ये येताना मोबाईल पॉवर बँक, पाणी बॉटल्स, नाणी, लाईटर, काडीपेटी यासारखे ज्वलवशील पदार्थ तसंच सिगारेट, गुटखा, तंबाखू यासारखे तंबाखूजन्य पदार्थ आणण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे हे साहित्य ठेवण्यासाठी स्टेडियमच्या बाहेरही कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळं प्रेक्षकांनी तिकिटावर दिलेल्या सूचना निश्चितपणे वाचून घ्याव्यात, असं आवाहन पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी केलंय. त्याचप्रमाणे आक्षेपार्ह झेंडे, पॅम्प्लेट देखील स्टेडियममध्ये आणण्यास मनाई आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा : प्रेक्षकांनी खासगी गाड्यांनी येणं टाळावं. कारण पार्किंगची कोणतीही सुविधा स्टेडियम परिसरामध्ये उपलब्ध नाही. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. लोकल ट्रेननं येणाऱ्या प्रेक्षकांनी स्टेडियम गेट नंबर एक दोन आणि सात या ठिकाणी येण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्थानकावर उतरावे. तर गेट नंबर तीन, चार आणि पाच (अ) या ठिकाणी पोहोचण्यासाठी मरीन लाईन्स स्टेशनवर उतरावे. शेवटी पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे आपण पालन करावे, अशी विनंती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी केलीय.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : द. आफ्रिकेनं न्यूझीलंडला धूळ चारली, गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप
  2. BCCI on Environmental Concerns : बीसीसीआयचा मोठा निर्णय, वायूप्रदूषणामुळं विश्वचषक सामन्यांत 'या' शहरात होणार नाही आतिशबाजी
  3. Hardik Pandya Injury : दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या संघात कधी परतणार? फिटनेसबाबत मोठं अपडेट जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.