मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway ) या गर्डर टाकण्याच्या कामासाठीच पावर मेगाब्लॉक (Power Mega block) आयोजित केलेला आहे. शनिवारी मध्यरात्री हे काम सुरू झाले आणि चार तासाच्या कालावधीनंतर हा गर्डर अत्यंत व्यवस्थित रीतीने लॉन्च करण्यात अभियंते तंत्रज्ञ आणि कर्मचारी कामगार यांना यश (Laying Girders work Successful) मिळाले. 432 मेट्रिक टन वजनाचा गर्डर असल्यामुळे आणि त्यासोबत बहात्तर मीटरचे ट्विन टाईप बॉक्स देखील असल्यामुळे याकरिता पावर ब्लॉक घेणे अत्यंत आवश्यक होते. (Laying Girders At Nahoor Railway Station Mumbai) वाहतूक थांबवल्याशिवाय हे काम करता येणे शक्य नव्हते. आता गरड टाकल्यानंतर इतर तांत्रिक काम करणे बाकी आहे. (Latest news from Mumbai)
थोडा त्रास, पण प्रवास पूर्ववत : मध्य रेल्वेवर महत्वाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचे काम शनिवारी हाती घेतले गेले आहे . त्यासाठी हा ब्लॉक ७ व ८ जानेवारी रोजी शनिवारी व रविवारी मध्यरात्री 1वाजून 20 मिमिटे ते पहाटे 4 वाजून 20 मिनिटे पर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गावर आणि 1वाजून 20 मिमिटे ते सकाळी 5 वाजून 15 मिनिटं पर्यंत विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर चालवला जाईल. या गर्डर टाकण्याच्या कामामुळे दोन दिवस प्रवासांना थोडा त्रास होणार आहे; मात्र त्यानंतर प्रवास पूर्वत होईल.
वाहतुकीला येणार वेग : या गर्डरमुळे रेल्वेवरील पुलाचे काम अत्यंत व्यवस्थित होईल आणि त्यानंतर त्या पुलावरची वाहतूक अत्यंत वेगाने होईल. त्या वाहतुकीला देखील सोयीचे होणार आहे. मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वे कडून सातत्याने अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या देखभाल कामामुळेच रेल्वे सुरळीत आणि नियमितपणे अखंड धावत असते.
रविवारी मध्यरात्रीपर्यंत पावर ब्लॉक : यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एके सिंग यांनी सांगितले की," मध्य रेल्वेने वरिष्ठांच्या सूचनेनुसार गर्डर टाकण्याचे काम केलेले आहे. त्यासाठीच पावर ब्लॉक घेण्यात आलेला आहे. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी देखील मध्यरात्री काही काळ पावर ब्लॉक असणार आहे. जनतेने यासंदर्भात आपले प्रवासाचे नियोजन रेल्वेचे गाड्यांचे वेळापत्रक पाहून करावे .म्हणजे त्यांना अडचण होणार नाही."