मुंबई : याचिकादारालाही म्हणजे पतीला, बहीण आणि आई आहे. त्या दोघींना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, पत्नीला तिच्या मनासारखे वागता येत नाही हे दुर्दैव आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकादार स्वत:च्या चुकीचा फायदा घेत आहे. त्याचे आचरण दोषमुक्त नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने असे म्हटले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की, आपण 21 व्या शतकात असलो तरीही मासिक पाळीच्या मुद्द्यावर महिलांवर अत्याचार होत आहेत.
पुरुष अजूनही स्त्रियांच्या मूलभूत क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवण्याचा करतात प्रयत्न : महिलांचे पेहराव आणि पुरुष अजूनही त्यांच्या मूलभूत क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यासाठी त्यांना स्वत:चे स्वातंत्र्य आणि त्यांच्या स्वतःच्या निवडी असायला हव्यात न्यायाधीश ए. एच. लद्दड यांनी कौटुंबिक न्यायालयात पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळताना निरीक्षण नोंदवले आहे. मार्च 2015 मध्ये संबंधित दाम्पत्याचा विवाह झाला आणि काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. विवाहानंतर चार महिन्यांतच पत्नीने सासरचे घर सोडले. सप्टेंबर 2016 मध्ये पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. पत्नी घरची कामे करीत नाही तिचा सहकार्य करण्याचा स्वभाव नाही.
पत्नीने आरोप फेटाळत पतीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर केले आरोप : तसेच आपल्या कुटुंबीयांसमोर ती आपला अपमान करते, अशी कारणे देत पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. तर दुसऱ्या बाजूला पत्नीने तिच्यावरील आरोप फेटाळत पतीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले. घरात साडीशिवाय अन्य कोणताही पेहराव करण्यास मनाई आहे. पंजाबी ड्रेस, नाईट ड्रेसही घालू दिले जात नाही, असा आरोप पत्नीने केला. सप्टेंबर 2016 मध्ये पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. मुख्यत: पत्नीच्या सहकारी वर्तनच्या कारणास्तव आणि दावा केला की ती घरातील कामे करीत नाही आणि तिने तिचा समोर अपमान केला.
कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली : या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली. या अटींचे अवलोकन केल्यावर माझे मत आहे की, त्या प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे आणि काय परिधान करावे आणि काय करू नये याचेही स्वातंत्र्य असले पाहिजे, असे कौटुंबिक न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने नोंदवले निरीक्षण : याचिकाकर्त्याच्या घरी आई आणि बहिणी आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, त्यांच्या पत्नीला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. माझे असे मत आहे की, याचिकाकर्त्याने क्रौर्याचे सामान्य आरोप केले आहेत, जे प्रत्येक वैवाहिक जीवनात सामान्य आहेत. शिवाय तो स्वतःचा चुकीचा फायदा घेत असतो. त्याचे आचरण स्वतःच दोषमुक्त नाही, असे ते पुढे म्हणाले.