ETV Bharat / state

Shivsena Bhavan Protest: शिवसेना भवना बाहेर महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर जमत गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. (shivsena bhavan protest).

Shivsena Bhavan Protest
Shivsena Bhavan Protest
author img

By

Published : Nov 7, 2022, 5:00 PM IST

मुंबई: जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा काही दिवसांपूर्वी झाली. या यात्रेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या भाषणावर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. त्यांनी अंधारे यांना 'नटी' असं म्हटलं होतं. या विरोधात आता शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक झाली असून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर जमत गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. (shivsena bhavan protest).

शिवसेना भवना बाहेर महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

गुलाबराव पाटील माफी मागा: याबाबत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या मीना कांबळे म्हणाल्या की, "महाप्रबोधन यात्रा जळगावात असताना तिथले पालकमंत्री गुलाबराव पाटील महिलांबाबत अपशब्द बोलले. एका पालकमंत्र्यांनी महिलांबाबत असं वक्तव्य करणं हे अतिशय वाईट आहे. आज शिवसेना भवनात जे आंदोलन झालं ते आता संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. गुलाबराव पाटील यांनी सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे. त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही आज शिवसेना भवनाबाहेर जोडे मारा आंदोलन केलं आहे."

आवाज दाबू शकत नाहीत: जळगावत झालेल्या महाप्रबोधन यात्रेनंतर सुषमा अंधारे यांची महाराष्ट्राचे राजकारणात जोरात चर्चा सुरू झाली आहे. सुषमा अंधारे यांचे सरकारकडून अडवणूक केली जातेय असा आरोप देखील केला जातोय. याबाबत बोलताना मीना कांबळे म्हणाल्या की, "सुषमा अंधारे या संविधानावर बोलतायत आणि त्यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. इतकंच काय शिवसेनेच्या महिला आघाडीचा आवाज देखील हे लोक दाबू शकत नाहीत. इतकी यांच्यात ताकद नाही. ही लोक शिवसेनेमुळे मोठी झाली नावारूपाला आली आणि त्याच शिवसेनेवर ही लोक पालटली. शिवसेनेची महिला आघाडी काय करू शकते हे गुलाबराव पाटील यांना चांगलंच माहिती आहे. हे त्यांना मला वेगळे सांगायची गरज नाही."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.