ETV Bharat / state

Mumbai Crime : फेसबूकवरील जाहीरात पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची, नाहीतर व्हाल कंगाल - आरोपीला फर्निचर विकायचे होते

Mumbai Crime: कफ परेड पोलीस सध्या एका अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत. त्याने आपली ओळख नौदल अधिकारी म्हणून सांगून 30 वर्षीय महिलेला गंडा घातला आहे. बोगस नौदल अधिकाऱ्याने महिलेला स्वस्त दरात फर्निचर विकण्याच्या बहाण्याने 2.07 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Oct 22, 2022, 8:39 PM IST

मुंबई: कफ परेड पोलीस सध्या एका अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत. त्याने आपली ओळख नौदल अधिकारी म्हणून सांगून 30 वर्षीय महिलेला गंडा घातला आहे. बोगस नौदल अधिकाऱ्याने महिलेला स्वस्त दरात फर्निचर विकण्याच्या बहाण्याने 2.07 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

फेसबुकवरील जाहिरातीमुळे संपर्कात: कफपरेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, नौदलाच्या बोगस अधिकाऱ्याने त्याची दुसऱ्या राज्यात बदली झाली असल्याची बतावणी केली. आणि त्याला वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि फर्निचर यासारख्या वस्तू स्वस्त दरात विकायचे होते. पोलिसात दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, फेसबुकवरील जाहिरातीद्वारे ती त्या व्यक्तीच्या संपर्कात आली. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख नारायण म्हणून सांगितली. तिने आरोप केला की, आरोपीला फर्निचर विकायचे होते, कारण त्याची दुसऱ्या राज्यात बदली झाली होती. त्याचे सामान विमानतळावर होते. त्या महिलेला एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशिन खरेदी करण्यात रस असल्याने नारायण सहमत झाला. 15000 ला विकण्यासाठी सूड पक्का झाला. त्यानंतर महिलेने 2000 रुपये अ‍ॅडव्हान्स पेमेंट केले. त्यानंतर आरोपीने तिला सांगितले की, संजय रावत नावाचा एक व्यक्ती तिला सामान देईल.

विमानतळावर सामान असल्याची माहिती: एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रावतने मग तिला कॉल केला आणि सांगितले की, नारायणने तिला तिच्याकडून 6100 रुपये घेण्यास सांगितले होते. आणि त्यानंतर तो तिच्या कफ परेडच्या पत्त्यावर सामान पोहोचवेल. तक्रारदार महिलेला अनेकवेळा पैसे हस्तांतरित करण्यास सांगून फसवले गेले. कारण रावत यांनी दावा केला की, त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यानंतर रावत यांनी महिलेला फोन करून सामान विमानतळावर असल्याची माहिती दिली. जांबळे नावाचा अधिकारी तिला क्लिअर करेल. विमानतळ अधिकारी म्हणून जांबळे यांनी काही मिनिटांनी तिच्याशी संपर्क साधला.

गुन्हा दाखल: तिला वस्तू मंजुरी शुल्क आणि इतर कर भरण्याच्या बहाण्याने अधिक पैसे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. त्यावेळी तिने आक्षेप घेतला तेव्हा, त्या माणसाने तिला आश्वासन दिले होते. माल तिच्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर पैसे परत केले जातील, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. नंतर, माल तिच्यापर्यंत पोहोचला नाही. आणि तिघांनी तिच्या कॉलला उत्तर देणे बंद केल्याने, महिलेने तिच्या पतीला कळवले आणि कफ परेड पोलिस स्टेशन Parade Police Station गाठले. फसवणूक आणि तोतयागिरीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.