मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरातील बोरिवलीच्या शिंपोली गावाने एका कुटुंबालाच वाळीत टाकल्याचे समोर ( Village Boycott Family )आले आहे. या कुटुंबाने पोलिसांत केलेली एक तक्रार मागे घेतली नाही. म्हणून गावदेवी ग्रामस्थ मंडळाने गावकऱ्यांची बैठक घेऊन या कुटुंबाला बहिष्कृत केल्याचा ठराव मंजूर केला. गावातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. असे पत्र पाठवून या कुटूंबाला कळविण्यात आले. ही कृती बेकायदा असल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. बोरिवली पोलिसांनी सहा जणांसह गावदेवी ग्रामस्थ मंडळावर गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबाला वाळीत टाकले : शिंपोली गावातील एका महिलेने याच गावात राहणाऱ्या तिघांविरुद्ध विनयभंग ( Woman Filed Molestation Case Against Three ) तसेच इतर आरोप करीत तक्रार केली होती. या तक्रारीवरून १६ एप्रिल २०२२ मध्ये पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार मागे घेण्यासाठी गावदेवी ग्रामस्थ मंडळाने २२ एप्रिल रोजी एक बैठक बोलवली. या बैठकीला महिला आणि तिच्या कुटुंबियांना बोलावण्यात आले. तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात ( villagers Pressurize Family to withdraw complaint ) आला. मात्र काहीही झाले तरी तक्रार मागे घेणार नाही. असा पवित्रा या कुटुंबाने घेतला. यानंतर गावातील रहिवाशांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे.
ग्रामस्थ मंडळावर गुन्हा दाखल : काही दिवस गेल्यानंतर मे महिन्यात गावदेवी ग्रामस्थ मंडळाकडून या कुटुंबाला एक पत्र आले. या पत्रामध्ये मंडळाची पुन्हा बैठंक घेण्यात आली. या बैठकीत आपल्या कुटुंबाला बहिष्कृत केल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे गावातील कोणत्याही समारंभ तसेच सुखदुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली. असे नमूद करण्यात आले होते. हे पत्र पाठविण्याबरोबरच मे महिन्यात गावामध्ये गावदेवीचा पालखी सोहळा पार पडला. देवीची पालखी या कुटुंबाच्या घराजवळ नेण्यात आली नाही. गावकरी आणि ग्रामस्थ मंडळाची वागणूक बेकायदा असल्याने या कुटुंबाने पोलिसांत धाव ( Case Filed Against Village Against Ostracism ) घेतली. त्यांच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यान्वये सहा गावकरी आणि गावदेवी ग्रामस्थ मंडळावर गुन्हा दाखल केला (FIR in borivali police station ) आहे.