ETV Bharat / state

VIDEO : लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून महिलेची आत्महत्या; इमारतीवरून मारली उडी - डिंपल वाडीलाल कांदिवली

गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असल्याने डिंपल मानसिक तणावाखाली होत्या. नोकरी नसल्याने त्यांचे लग्नही जमत नव्हते, अशी माहिती डिंपल यांच्या आईने दिली आहे. या सर्व गोष्टींमुळे नैराश्याखाली येऊन डिंपलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ऊचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. डिंपल वाडीलाल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

sui
मृत डिंपल वाडीलाल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारतानाची घटना कॅमेऱ्यात कैद
author img

By

Published : Jan 3, 2020, 4:58 PM IST

मुंबई - लग्न जमत नसल्याने आलेल्या नैराश्यातून गुरुवारी एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली आहे. चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रॉक एव्हेन्यू इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून या महिलेने उडी घेतली. डिंपल वाडीलाल, असे मृत महिलेचे नाव आहे. महिला इमारतीवरून उडी मारतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मृत डिंपल वाडीलाल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारतानाची घटना कॅमेऱ्यात कैद

डिंपल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इमारतीच्या गच्चीवर डिंपल यांना वाचवण्यासाठी एक व्यक्ती पुढे सरसावल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, त्या व्यक्तीने डिंपल यांना पकडण्याआधीच डिंपल इमारतीवरून खाली पडल्या.

हेही वाचा - स्वतःवर गोळी झाडून एकाची आत्महत्या, नंदुरबारातील घटना

गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगारी असल्याने डिंपल मानसिक तणावाखाली होत्या. नोकरी नसल्याने त्यांचे लग्नही जमत नव्हते, अशी माहिती डिंपल यांच्या आईने दिली आहे. या सर्व गोष्टींमुळे नैराश्याखाली येऊन डिंपलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ऊचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संदर्भात चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Intro:मुंबईतील कांदिवली परिसरातील चारकोप पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रॉक एवेन्यू या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून गुरुवारी एका 40 वर्षीय युवतीने उडी मारुन आत्महत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या व मानसिक तणावाखाली आलेल्या डिंपल वाडीलाल या चाळीस वर्षाच्या युवतीने नैराश्येपोटी येऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे .
Body:इमारतीच्या सहाव्या मजल्यावर उभी राहून ही युवती उडी मारताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आत्महत्या करीत असताना सदरच्या युवतीला अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र इमारतीच्या गच्चीवर तिला वाचविण्यासाठी आलेली व्यक्तीच्या हातात येण्या आगोदर डिंपल हिने उडी मारून आत्महत्या केली. मयत डिंपल वाडीलाल ही काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होती. बरेच प्रयत्न करूनही कुठल्याही ठिकाणी तिला नोकरी मिळत नसल्यामुळे तिचे लग्नही जमत नसल्याचे तिच्या आईकडून सांगितलं जात आहे. यामुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संदर्भात चारकोप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.