ETV Bharat / state

Winter Session: नागपूरात 19 डिसेंबरपासून ​विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, मुख्यमंत्री सीमावादावर ठराव मांडणार...​ - Winter Session of Legislature

राज्य​ विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन ( Winter Session )​ येत्या सोमवारपासून नागपूर ( Winter Session in Nagpur ) येथे सुरु होणार आहे. अधिवेशनाचे कामकाज 19 ते 30 डिसेंबर ​या कालवधीसाठी निश्चित​ ​करण्यात आले आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ​निर्णय​ घेण्यात आला.​ सुमारे 21 विधेयके अधिवेशनाच्या पटलावर येणार आहेत. ​

Winter Session
हिवाळी अधिवेशन
author img

By

Published : Dec 13, 2022, 5:14 PM IST

मुंबई: जूनमध्ये राज्यात अभूतपूर्व सत्ताबदलानंतर पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात राजकीय नेत्यांनी नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत अधिवेशनाचे कामकाज पार पाडले. आता राज्य​ विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन​ येत्या सोमवारपासून नागपूर ( Winter Session in Nagpur ) येथे सुरु होणार आहे. अधिवेशनाचे कामकाज 19 ते 30 डिसेंबर ​या कालवधीसाठी निश्चित​ ​करण्यात आले आहे.

कामकाज सल्लागार समितीची बैठक: मुंबई​त विधानभव​नात अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली​ पार पडली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे व खनिकर्म विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधा​​न​ ​परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान​ ​परिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.

सीमाप्रश्नावर ठराव: ​विधिमंडळाच्या हिवाळी​ अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राब​​विण्याबाबत चर्चा झाली. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक 28 डिसेंबर रोजी घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात अंदाजे 21 विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली​ आहे. ​

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.