ETV Bharat / state

Fadnavis Vs Uddhav : तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis rally Goregaon mumbai

तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय ( Devendra fadnavis on uddhav thackeray ) राहणार नाही ( Devendra fadnavis on babri ) असे आव्हान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis rally news mumbai ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. मुंबईत आयोजित हिंदी भाषीक महासंकल्प सभेत ते बोलत होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : May 15, 2022, 8:18 PM IST

Updated : May 16, 2022, 9:07 AM IST

मुंबई: तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय ( Devendra fadnavis on uddhav thackeray ) राहणार नाही असे आव्हाण ( Devendra fadnavis on babri ) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. संभाजी राजांचा खून करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी वर जाऊन तो ओवेसी नतमस्तक होतो त्याला हे सरकार पाठीशी घालत आहे. आम्ही तलवार म्यान केली नाही आम्ही ठाम पणे मुकाबला करु. मुंबईकरांना मराठी समजते. पण एक मुंबईकर असा आहे जो आहे मुंबई ची वाट लावत आहे म्हणून मी मराठीत बोलणार म्हणत त्यांनी ( Devendra Fadnavis rally news mumbai ) जोरदार टीकास्त्र सोडले.

बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस

भाई और बहण, का हालचाल बा, सब ठीक बा ना?.... असे म्हणत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis rally Goregaon mumbai ) यांनी हिंदी भाषी महासंकल्प सभेच्या भाषणाला सुरुवात केली. या सभेत फडवणीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेचा भरपूर समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा 'मास्टर' सभा नाही, तर 'लाफ्टर' सभा होती. काल काही तेजस्वी, ओजस्वी एकायला भेटेल असे मला वाटले होते. पण लाफ्टर शो शेवट पर्यंत संपला नाही, ते म्हणाले होते 100 सभांची एकच सभा 100 कौरव असतात त्यामुळे काल कौरवांची सभा झाली आज पांडवाची सभा आहे.

सभेमध्ये हनुमान चालीसाचे सामूहिक वाचण करण्यात आले, त्यावर बोलताना फडवणीस म्हणाले, ' राम दुवारे तुम रखवारे, होत ना आज्ञा बिन पैसा रे', इतकीच हनुमान चालीसा उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारला माहित आहे. तसेच संभाजी राजांचा खून करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी वर जाऊन तो ओवेसी नतमस्तक होतो त्याला हे सरकार पाठीशी घालत आहे. आम्ही तलवार म्यान केली नाही आम्ही मुकाबला ठामपणे करु असेही फडणवीस म्हणाले.

राम जन्म भूमीच्या अयोध्येत तुमचा एकही नेता नव्हता. असे मी म्हणालो तर तुम्हाला किती मिरची लागली. मी गेलो होतो बाबरी पडायला. डिसेंबर मध्ये मी बाबरी पाडायला गेलो होतो. सहलीला चला सहलीला चला, हे काय आहे? असा शाब्दिक प्रहार करत नव्हतो, 'लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगे' हा नारा देत गेलो होतो. कार सेवकांना मारले तेव्हा बाबरी मशीदी वर झेंडा लावला होता. मला अटक झाली होती. बदायु जेल मध्ये मी वाट बघत होतो पण एकही शिवसैनिक तेथे आला नाही. बाबरी मशिद पाडली तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल त्यांनी केला. तसेच आम्ही जमिनीवरचे राजकारण केले. कुठे हॉटेल मध्ये झोपलो नाही. रस्त्यावर झोपलो. मी सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालो नाही. पुन्हा कधी कार सेवकांची गरज असेल तेव्हा पण आम्ही जाऊ असेही त्यांनी सुनावले.

आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा वजन १२८ किलो होते. माझं एफएसआय २.५ आहे. असे सांगत हा देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या सतेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे शरद पवार याना मैद्याचे पोते म्हणायचे. मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही. २ वर्ष कोरोना चा संघर्ष चालला. कुठे होते उद्धव ठाकरे, होते पण फेस बुक लाइव्ह वर होते. बाळासाहेब भोळे होते, उद्धव धूर्त होते. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून ते बिथरले आहेत. बाळासाहेब वाघ होतेच, पण या देशात आता एकच वाघ आहे त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी. तुम्ही म्हणता ना मंदिरातील घंटा नाही तर दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा पाहिजे तर तो आहे नरेंद्र मोदी.

तुमचं हिंदुत्व हे गधाधारीच आहे, लाथा गधा मारतो. पैलवान ठोकर मारतो. राहुल भट हत्येनंतर काश्मीर मध्ये ३ दहशतवाद्यांना ठार मारले हे विसरु नका. तुम्ही आमची संपती घेऊन गेले व दुसऱ्याशी लग्न केले. सोडचीठ्ठी ही दिली नाही. असे सांगत सकाळच्या शपथविधी वर त्यांनी पुन्हा प्रहार केला. कालचे भाषण सोनियाजी यांना समर्पित होते. कारण त्यांनी काल भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्या ते सोनिया गांधी यांना खुश करण्यासाठीच. मुंबईला महाराष्ट्र पासून तोडण्याचे षड्यंत्र हे पाठच करून ठेवले आहे. कुणाच्या बापाची हिमत आहे, मुंबईला तोडण्याची. इतिहास तपासा. आम्हाला मुंबई तुमच्या भ्रष्टाचारातून वेगळी करायची आहे. आम्ही मुंबईचे बाप आहोत असे तुम्ही म्हणता, तर भारताचा एकच बाप आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

करोना बैठकीत पंतप्रधान मनोरंजन करत होते असे तुम्ही म्हणता. तुम्ही आयपीएल म्हणून बैठकीत बसत असताल तर नवल आहे. शेतकरी, एस टी कर्मचारी यांच्या आत्महत्या, ओबीसी आरक्षण, वीज भेटत नाही त्याकडे कोण पाहणार आहे? विकासावर काहीच बोलत नाही. सामान्य माणसाचं दुःख कसे समजेल. जेव्हा तुम्ही राज महालातून बाहेर पडाल तेव्हाच ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सकाळचा शपथ विधी केला, तो यशस्वी झाला नाही त्याचा आनंद आहे. झाला असता तरी नवाब मलिक, अनिल देशमुख हे मंत्री मंडळात नसते. सामना मध्ये सत्य छपून येते. मग २०१४ साली सामना मध्ये सोनिया गांधी व शरद पवार यांच्या बद्दल जे छापून येत होते ते सत्य होते का. असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Kirit Somaiya Sensational Statement : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन बायका - किरीट सोमय्यांचे खळबळजनक वक्तव्य

Last Updated : May 16, 2022, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.