मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ट्विटरवरून राष्ट्रद्रोही म्हटले होते. हे ट्विट राहुल गांधींना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. भोईवाडा न्यायालयाने मुंबई पोलिसांना या ट्विटची चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची चौकशी मुंबई पोलीस करणार का? असा प्रश्न रणजित सावरकर यांनी उपस्थित केले आहे.
विक्रम संपथ यांनी लिहलेल्या सावरकर यांच्यावरील 'इकॉस फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. यावेळी त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटच्या विरोधात सातंत्र्यवीर स्मारक समितीने भोईवाडा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने मुंबई पोलिसांना राहुल गांधी यांच्या ट्विटची चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान या कार्यक्रमाला उध्दव ठाकरे, नीलम गोऱ्हे, भारत कुमार राऊत यांची उपस्थिती होती.