ETV Bharat / state

पालिका रुग्णालयात उपचार करण्याआधी पोलिसांना द्यावी लागतेय माहिती; नागरिकांमध्ये संताप

अपघात किंवा दुर्घटना प्रकरणी रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाची माहिती पोलिसांना दिली जाते. मात्र, आता साधा कोणताही आजार झाला आणि तुम्ही शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती होणार असाल तर आधी पोलिसांना त्याची माहिती द्यावी लागत आहे.

मुंबई महानगरपालिका रुग्णालय
author img

By

Published : Oct 27, 2019, 7:42 PM IST

Updated : Oct 28, 2019, 9:06 AM IST

मुंबई - अपघात किंवा दुर्घटना प्रकरणी रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाची माहिती पोलिसांना दिली जाते. मात्र, आता साधा कोणताही आजार झाला आणि तुम्ही शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती होणार असाल तर आधी पोलिसांना त्याची माहिती द्यावी लागत आहे. एखाद्याला आजार काही सांगून येत नाहीत. अचानक आजारी पडल्यास त्या व्यक्तीला अपघात विभागातच उपचारासाठी न्यावे लागते. त्या ठिकाणी आधी पोलिसांना माहिती द्या नंतर उपचारासाठी भरती करा, असे सांगितले जात असल्याने रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

याबाबत माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

अपघात, आत्महत्या, खून, प्राणघातक हल्ला, अशा प्रकरणात सर्वात आधी रुग्णालयातील अपघात विभागात उपचार केले जातात. त्याठिकाणी असलेले डॉक्टर किंवा कर्मचारी संबंधित रुग्णाची माहिती तो राहत असलेल्या स्थानिक पोलिसांना किंवा गुन्हा घडला त्या ठिकाणच्या पोलिसांना देतात. अशा प्रकरणात पोलीस रुग्णालयात येऊन संबंधित रुग्ण किंवा त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवण्याचे काम करून पुढील कारवाई करतात. या कालावधीत रुग्णांवर उपचार सुरु असतात त्यामुळे रुग्णाचे हाल होत नाहीत. तसेच त्याचा जीवही वाचतो.

ताप, हार्टअटॅक, अर्धांगवायूचा झटका (लकवा), फ्रॅक्चर, आदी कोणतेही साधे आजार झाले की मुंबईकर पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी जातात. पालिका रुग्णालयात ओपीडी सुरु असल्यास त्याठिकाणी उपचार केले जातात. तर, इतर वेळी २४ तास सुरु असलेल्या अपघात विभागात उपचार केले जातात. मात्र, आता हार्टअटॅक, अर्धांगवायू, ताप या सारख्या साध्या आजारांच्या उपचाराकरीता भरती होण्याआधी पोलिसांना माहिती द्यावी लागत आहे. रुग्णालयातील पोलिसांनी नोंद केल्या शिवाय पालिका रुग्णालयात उपचारासाठी भरतीच केले जात नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- चुनाभट्टी ते बीकेसी पूल होणार सुरू? एमएमआरडीएचे आश्वासन

रुग्णालयातील पोलीस संबंधित रुग्ण राहत असलेल्या स्थानिक पोलिसांना माहिती देतात. स्थानिक पोलिसांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करून जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात बोलवले जाते. विशेष म्हणजे, एखाद्या घरातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाल्यास त्याच्या कुटुंबाची पळापळ सुरु असते. रुग्ण बरा कसा होईल हे पाहिले जाते. मात्र, अशा वेळी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी जावे लागणार असल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा प्रकार त्वरित बंद करावा, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

हेही वाचा- नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले

Intro:मुंबई - एखाद्या अपघात किंवा दुर्घटनेच्या प्रकरणी रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाची माहिती पोलिसांना दिली जाते. मात्र आता साधा कोणताही आजार झाला आणि तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती होणार असाल तर आधी पोलिसांना त्याची माहिती द्यावी लागत आहे. एखाद्याला आजार काही सांगून येत नाहीत. अचानक आजरी पडल्यास त्या व्यक्तीला अपघात विभागातच उपचारासाठी न्यावे लागते. त्याठिकाणी आधी पोलिसांना माहिती द्या नंतर उपचारासाठी भरती करा असते सांगितले जात असल्याने रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. Body:एखादा अपघात झाला, एखाद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एखादा खून झाला, कोणाकर प्राणघातक हल्ला झाला तर अशा प्रकरणात रुग्णालयात सर्वात आधी अपघात विभागात उपचार केले जातात. त्याठिकाणी असलेले डॉक्टर किंवा कर्मचारी संबंधित रुग्णाची माहिती तो राहत असलेल्या स्थानिक पोलिसांना किंवा गुन्हा घडला त्याठिकाणच्या पोलिसांना देतात. अशा प्रकरणात पोलीस रुग्णालयात येऊन संबंधित रुग्ण किंवा त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवण्याचे काम करून पुढील कारवाई करतात. या कालावधीत रुग्णांवर उपचार सुरु असतात त्यामुळे रुग्णाचे हाल होत नाहीत. तसेच त्याचा जीवही वाचतो.

मात्र आता एखाद्याला ताप आला काही दिवस तो ताप गेला नाही, हार्टऍटॅक आला, अर्धांगवायूचा झटका (लकवा) आला, फ्रॅक्चर झाले, आदी कोणतेही साधे आजार झाले की मुंबईकर पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी जातात. पालिका रुग्णालयात ओपीडी सुरु असल्यास त्याठिकाणी उपचार केले जातात. तर इतर वेळी २४ तास सुरु असलेल्या अपघात विभागात उपचार केले जातात. या अपघात विभागात आता साधा एखादा आजार झाला, हार्टऍटॅक किंवा अर्धांगवायूचा झटका आला आणि उपचारासाठी गेल्यावर रुग्णाला भरती करण्याआधी रुग्णालयातील पोलिसांना माहिती द्यावी लागत आहे. रुग्णालयातील पोलिसांनी नोंद केल्या शिवाय पालिका रुग्णालयात उपचारासाठी भरतीच केले जात नाही.

रुग्णालयातील पोलीस संबंधित रुग्ण राहत असलेल्या स्थानिक पोलिसांना माहिती देतात. स्थानिक पोलिसांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करून जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात बोलवले जाते. विशेष म्हणजे एखाद्या घरातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाल्यास त्याच्या कुटूंबाची पळापळ सुरु असते. रुग्ण बरा कसा होईल हे पाहिले जाते. मात्र अशा वेळी पोलीस ठाण्यात जबाब नोंवण्यासही जावे लागते. यामुळे आता मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा प्रकार त्वरित बंद करावा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
Conclusion:
Last Updated : Oct 28, 2019, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.