ETV Bharat / state

Face to Face : महिला आणि बालकांच्या विकासासाठी नव्या योजना आणणार - मंत्री मंगल प्रभात लोढा - Schemes of State Govt for women empowerment

राज्यातील महिलांच्या आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारच्यावतीने जास्तीत जास्त प्रयत्न करणार (Schemes of State Govt for women empowerment ) आहे. गुजरातच्या धर्तीवर काही नव्या योजना महाराष्ट्रात राबवण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. दीपावली बाजार पासून ते महिलांच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी हे आमचे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी सांगितले.

Mangal Prabhat Lodha
मंत्री मंगल प्रभात लोढा
author img

By

Published : Oct 8, 2022, 12:34 AM IST

Updated : Oct 8, 2022, 4:03 PM IST

मुंबई - राज्यातील महिला आणि बाल विकासासाठी राज्य सरकारच्यावतीने अनेक प्रयत्न केले जाणार आहेत. या राज्याचे नवनिर्वाचित मंत्री मंगल प्रभात लोढा ( State Minister Mangal Prabhat Lodha ) यांनी विभागाचा पूर्ण आढावा घेतला असून विभागामध्ये कोणकोणत्या नव्या योजना राबवता ( Schemes of State Govt for women empowerment ) येतील याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.

मंत्री मंगल प्रभात लोढा

गल्लीबोळात रुग्णवाहिकांची सोय - कोणत्याही घरी बाळाच्या आगमनाने होणारा आनंद अवर्णनीय असतो. मात्र जेव्हा बालकांना आणि त्याच्या आईला रुग्णालयातून घरी आणले जाते तेव्हा घेऊन येणारी रुग्णवाहिका गल्लीबोळात आल्यानंतर लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण रुग्णवाहिका शक्यतो गंभीर रुग्णांशी अथवा अप्रिय घटनेशी संबंधित मानली जाते. रुग्णवाहिकेकडे बघण्याचा सर्वसामान्यपणे असाच दृष्टिकोन असल्यामुळे महिला आणि बाल विकास विभागाने आता खिलखीलाहट ही रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ( Ambulance facility in lanes )सांगितले. या रुग्णवाहिकेचा सायरन हा लहान मुलांच्या हसण्याच्या आवाजाचा असेल. तसेच या रुग्णवाहिकेची डिझाईनही लहान मुलांच्या स्वागतासाठी अथवा त्यांना आवडेल अशी करण्यात येणार आहे त्यामुळे अशा रुग्णवाहिका आल्यानंतर लोक त्यांचे आनंदाने स्वागत करतील. त्यामुळे सध्या तरी मुंबई उपनगरातील लहान मुलांच्या एक दोन रुग्णालयांची संलग्न अशा रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत. असेही लोढा यांनी सांगितले.

बचत गटांसाठी दीपावली बाजार - राज्यातील बचत गटांच्या उत्पादनांना अधिक संधी मिळावी त्यांना जास्तीत जास्त विक्रीची संधी मिळावी. या माध्यमातून महिला अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी राज्य सरकारतर्फे दीपावलीच्या निमित्त दीपावली बाजार सुरू करण्यात येणार ( Diwali bazaar for self help groups ) आहे. या बाजारांमध्ये महिला बचत गटामार्फत तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर पासून मुंबईत हा बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.

कंटेनरमध्ये फॅब्रिकेटेड अंगणवाड्या - मुंबईमध्ये जागे अभावी अंगणवाड्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुंबईत अंगणवाड्या कोणाच्यातरी घरात अथवा एखाद्या सार्वजनिक सभागृहात भरवल्या जातात. त्यामुळे आता अंगणवाड्या एखाद्या कंटेनरमध्ये फॅब्रिकेटेड रिचार्ज तयार करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांची अवस्था अधिक चांगली व्हावी आणि दर्जेदार शिक्षण आणि सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी अंगणवाड्या दत्तक योजनाही आम्ही सुरू केली आहे ज्या सेवाभावी संस्था अथवा कॉर्पोरेट कंपन्यांना मदत करायची असेल त्यांनी अंगणवाड्या दत्तक घ्याव्यात असे आवाहनही आम्ही केले असल्याचे लोढा यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या आवाहनाला 500 पेक्षा अधिक लोकांनी प्रतिसाद दिला आहे. अशा संस्था आणि कंपन्यांची आम्ही सामंजस्य करार करून त्यांना दत्तक पॉलिसीनुसार अंगणवाड्या देणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

कुपोषणाच्या समस्येवरही तोडगा - राज्यात कुपोषणाची समस्या अजूनही तीव्र आहे. कुपोषणाची समस्या असल्याचे आम्ही मान्य करतो त्याबाबत आम्ही आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाशी एकत्रित मिळून काम करीत आहोत. त्यावर उपाय करण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र एका वर्षाच्या कालावधीत आम्ही तोडगा काढू असेही लोढा यांनी सांगितले.

महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी - राज्य सरकारने तयार केलेल्या महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. महिला धोरणाबाबत आणखी काही सूचना असल्यास आम्ही त्याचा नक्कीच विचार करू मात्र जास्तीत जास्त प्रभावीपणे हे धोरण राबवण्याचा आमचा विचार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Oct 8, 2022, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.